Wrestlers Protest : 'न्यायाच्या लढाईत आम्ही...' आंदोलनातून माघार घेण्याच्या वृत्तावर साक्षी मलिक काय म्हणाली? | Sakshi Malik Marathi News | Protest Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestlers Protest Sakshi Malik

Wrestlers Protest Sakshi Malik : 'न्यायाच्या लढाईत आम्ही...' आंदोलनातून माघार घेण्याच्या वृत्तावर साक्षी मलिक काय म्हणाली?

Wrestlers Protest Sakshi Malik : कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट रेल्वेतील त्यांच्या नोकरीवर परतले आहेत. मात्र, कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त साक्षी मलिकने फेटाळून लावले आहे.

खरं तर साक्षी मलिकने कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त होते. मात्र तिने या बातम्याचे खंडन केले आहे. न्यायाच्या लढ्यात आमच्यापैकी कोणीही मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. यापूर्वी साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियान यांनीही आंदोलनातून माघार घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केली होती. हे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते. मात्र क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू परतले.

7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिज भूषण विरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले.

पहिली एफआयआर अल्पवयीन मुलाने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी एफआयआर इतर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित आहे. या प्रकरणांचा पोलिस तपास सुरू आहे.