
WFI office Worked From Former Chief Bhushan Sharan Singh House : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI)चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारताच्या महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर माजी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली फेडरेशन चालवण्याचे क्रीडा मंत्रालयाने आदेश दिले होते व कुस्ती महासंघाचे मुख्यालय २१, अशोका रोड, दिल्ली म्हणजेच माजी खासदारांच्या घरातून १०१, हरी नगर, आश्रम चौक, नवी दिल्ली येथे हलवण्यात आले होते. ब्रिजभूषण यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे, अशात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.