Wriddhiman Saha News| वृद्धीमान साहाला धमाकावणं महागात, पत्रकार मजुमदारांवर दोन वर्षांची बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wriddhiman saha threatening  journalist boria majumdar banned by bcci for 2 years

वृद्धीमान साहाला धमाकावणं महागात, पत्रकार मजुमदारांवर दोन वर्षांची बंदी

वृद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) धमकावल्याबद्दल बीसीसीआयने क्रिकेट पत्रकार बोरिया मजुमदार (Boria Majumdar) यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. यादरम्यान मजुमदार देशातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये जाता येणार नाही. याशिवाय बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहून मजुमदारला ब्लैकलिस्टमध्ये टाकण्याचे आवाहन करणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. आता बोर्ड सर्व राज्य क्रिकेट बोर्ड आणि इतर जबाबदार लोकांना याची माहिती देणार आहे.(wriddhiman saha threatening journalist boria majumdar banned)

वृद्धिमान साहाने हे प्रकरण 19 फेब्रुवारीला समोर आले, जेव्हा त्याने ट्विट करून यांच्याशी झालेल्या संभाषणाचे फोटो शेअर केले. वृद्धिमान साहा याला मुलाखत देण्यासाठी जबरदस्ती करत असताना त्याने धमकावत असल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसून आले. वृद्धिमान साहाला सांगितले की, तुम्ही मला फोन केला नव्हता, मी तुम्हाला यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही. मी अपमान सहजासहजी विसरत नाही आणि मला ते लक्षात राहील.

स्नॅपशॉट ट्विट करत साहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतीय क्रिकेटमधील माझ्या सर्व योगदानानंतर, मला एका तथाकथित पत्रकाराकडून या गोष्टीचा सामना करावा लागला आहे! आज पत्रकारिता कुठे पोहोचली आहे. वृद्धिमान साहाच्या ट्विटनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करत पत्रकाराचे नाव सार्वजनिक करण्यास सांगितले होते. सुरुवातीला सार्वजनिकरित्या नाव देण्यास नकार दिल्यानंतर, साहाने नंतर बीसीसीआय पॅनेलसमोर मुझुमदार यांचे नाव उघड केले.

Web Title: Wriddhiman Saha Threatening Journalist Boria Majumdar Banned By Bcci For 2 Years Sports News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wriddhiman SahaBCCI
go to top