Ind vs Aus WTC Final Day 5 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा ऑस्ट्रेलियाकडे; भारताची पुन्हा हाराकिरी

 Australia WTC Champion
Australia WTC Champion esakal
Updated on

Ind vs Aus WTC Final Day 5 : गेल्या दोन वर्षापासून दमदार कसोटी क्रिकेट खेळणारा भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे WTC Final मध्ये पोहचला. सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळणाऱ्या भारतीय संघाचा यंदा सामना हा कडवट ऑस्ट्रेलियाशी झाला. हा सामना पाच दिवसापर्यंत रंगला ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताचा 209 धावांनी पराभव करत WTC Final वर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. भारताचे सलग दुसऱ्यांदा WTC Final जिंकण्याचे स्वप्न भंगले. भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न दशकभरापासून अधुरे होते ते आताही अधुरेच राहिले.

ऑस्ट्रेलियाने भारताचा  धावांनी पराभव करत पटकावली WTC ची गदा

रहाणे बाद झाल्यानंतर श्रीकार भरतने 23 धावांची खेळी केली. मात्र कांगारूंनी भारताच्या तळातील फलंदाजांना स्वस्तात गुंडाळण्यात यश मिळवले. शार्दुल शुन्य, उमेश एक धावेची भर घालून माघारी परतला त्यानंतर भरतलाही लॉयनने 23 धावांवर बाद करत केले. भारताचा दुसरा डाव 234 धावात संपुष्टात आणला.

अजिंक्य रहाणेचीही झुंज अर्धशतकाविनाच संपली

विराट कोहली अन् रविंद्र जडेजा स्वस्तात माघारी गेल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपली झुंज सुरूच ठेवली. त्याने श्रीकार भरतच्या साथीने भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. दरम्यान, रहाणे 46 धावांपर्यंत पोहचला होता. मात्र मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या एका चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. बाद झाल्यानंतर अजिंक्यने डोक्यालाच हात लावला. अजिंक्यनंतर शार्दुल देखील नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर शुन्यावर पायचीत झाला.

भारताची पाचव्या दिवशी खराब सुरूवात

भारताने WTC Final च्या पाचव्या आणि निर्णायक दिवशी भारताला पहिल्या सत्रात चांगली सुरूवात करणे गरजेचे होते. कालच्या 3 बाद 164 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. अजिंक्यने सकारात्मक खेळण्याचा प्रय त्न केला. तर विराट कोहली आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता.

मात्र स्कॉट बोलँडने 49 धावांवर असताना विराट कोहलीला बाद केले. विराटने बोलँडचा बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्न केला अन् तो स्लीपमध्ये बाद झाला. स्मिथने त्याचा अप्रतिम झेल पकडला. यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाला फारशी चमक दाखवता आली नाही. तो दुसऱ्याच चेंडूवर बोलँडची शिकार झाला.

पावसामुळे खेळ होणार खराब? विजयासाठी 280 धावांची गरज; कोहली-रहाणेकडून अपेक्षा

शेवटच्या दिवशी 99 टक्के पाऊस करणार खेळखंडोबा, कोणता संघ येणार अडचणीत? जाणून घ्या हवामान अंदाज

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com