WTC Final Ind vs Aus : भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान, सामन्याचा डोलारा हेलकावे खाणार

WTC Final Ind vs Aus
WTC Final Ind vs Aus

WTC Final Ind vs Aus : जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील निकालाची भिस्त भारतीय फलंदाजांवर विसंबून असल्याची चर्चा सगळे करत आहेत. दर्जेदार ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीला भारतीय फलंदाज कसे तोंड देतात या गोष्टीवर सामन्याचा डोलारा हेलकावे खाणार असल्याचा मुद्दा मांडला जातो आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे, की खरे आव्हान भारतीय फलंदाजांनाच आहे.

खास करून पहिल्या डावात भारतीय फलंदाज किती वेळ फलंदाजी करू शकतात आणि किती धावा उभारतात हे बघायला सगळेच उत्सुक आहेत. म्हणायला गेले तर अजिंक्य रहाणे संघात परतल्याने मधली फळी जास्त सक्षम वाटत आहे. उणीव एकाच फलंदाजाची जाणवणार तो म्हणजे रिषभ पंत. विराट कोहलीप्रमाणेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रिषभ पंतने बरेच सतावले होते याची आठवण सगळ्यांनाच होते आहे.

WTC Final Ind vs Aus
Topless Sports league: 'या' अनोख्या स्पोर्ट्स लीगची चर्चा! नक्की काय आहे स्पर्धा, जाणून घ्या

२०१६ सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्याअगोदर विराट कोहलीची सर व्हीवियन रिचर्डस् यांच्याशी सविस्तर भेट झाली होती. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीला फलंदाज म्हणून अपयश आले होते. विराटने सर व्हीव यांना त्यासंदर्भात सल्ला विचारला असताना ते म्हणाले होते, की दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान असतात.

अशा खेळपट्ट्यांवर चेंडू वेगाने फलंदाजाकडे येतो. अशा वातावरणात फलंदाजाला झटकन चेंडू खेळायला तयार राहावे लागते. इंग्लंडची गोष्ट वेगळी आहे. इथल्या वातावरणात टप्पा पडल्यावर चेंडू थोडा सावकाश हलतो. तसेच थोडा सावकाश वेगाने फलंदाजाकडे येतो. विराट तू चेंडूकडे जाण्याची घाई करू नकोस. चेंडूला तुझ्याकडे यायला वेळ दे. हे तंत्र तू अवलंबलेस तर इंग्लंडमध्ये पोत्याने धावा करशील, हा सल्ला सरांनी दिला.

WTC Final Ind vs Aus
WTC Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण होणार विजेता?

‍दुसऱ्या दिवशी अँटीगा कसोटी सामन्यात विराटने द्विशतक ठोकले होते. मी विराटला इंग्लंडमध्ये कसे खेळायचे याचा सल्ला दिला होता. त्याने आम्हालाच त्याचा झटका दिला, असे सर व्हीव हसत हसत म्हणाले होते. २०१८ सालच्या इंग्लंड दौऱ्यात विराटने दोन शतकांसह इंग्लंड संघाविरुद्ध भरपूर धावा करून तोडीस तोड उत्तर दिले होते.

नेमके असेच काहीसे तंत्र भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना तोंड देताना अवलंबावे लागणार आहे. विराट कोहली सर व्हीवियन रिचर्डस् यांचा लाडका फलंदाज असला तरी सरांच्या मते जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्रास देऊ शकतो.

दरम्यान, भारतीय फलंदाज गुड लेंग्थ चेंडूवर पुढे सरसावत फटका मारायचा मोह टाळून मागे रेलत चेंडूची वाट बघून स्विंगचा अंदाज घेत खेळायचा सराव करत असल्याचे दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com