
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. दोन्ही संघांना मिळून २५५ धावा करता आल्या. तर दिवसभरात १४ विकेट पडल्या. कगिसो रबाडा, मार्को येनसन आणि मिशेल स्टार्क यांनी विकेट्स घेतल्या. दिवसभरात अनेक विक्रम झाले. दरम्यान, एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंग्लंडमध्ये १४५ वर्षे आणि ५६१ कसोटी कसोटी सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलंय.