esakal | रोमन रेंसने घेतला भावाचा बदला; कविनची अवस्था केली केविलवाणी
sakal

बोलून बातमी शोधा

 wwe, wwe smackdown, roman reigns, kevin owens, jey uso

 SmackDown ची सुरुवात यूनिवर्सल चॅम्पियन रोमन रेंसच्या सिगमेटने झाली. यात त्याने आपला भाऊ जे उसो आणि एडवोकेट पॉल हेमन यांच कौतुक केलं. यादरम्यान केविन ओवेंसची एन्ट्री झाली. त्याने रोमन रेंसवर निशाणा साधत  जे उसोला मॅच खेळण्याचे चॅलेंज दिले.

रोमन रेंसने घेतला भावाचा बदला; कविनची अवस्था केली केविलवाणी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

रोमन रेंस (Roman Reigns) ने ज्याप्रमाणे 2020 वर्षाचा शेवट केला होता अगदी त्याच तोऱ्यात नव्या वर्षातही धमाकेदार सुरुवात केली आहे. याच आठवड्यात WWE स्मॅकडाउन (SmackDown)च्या  मेन इव्हेटमध्ये जो हाल, रोमन रेंस आणि जे उसो (Jey Uso) यांनी  केविन ओवेंस (Kevin Owens) हालत खराब केल्याचे पाहायला मिळाले. डब्ल्यूडब्लूईचा चाहता केविनची केविलवाणी झालेली अवस्था कधीही विसरणार नाही, अशीच होती.

SmackDown ची सुरुवात यूनिवर्सल चॅम्पियन रोमन रेंसच्या सिगमेटने झाली. यात त्याने आपला भाऊ जे उसो आणि एडवोकेट पॉल हेमन यांच कौतुक केलं. यादरम्यान केविन ओवेंसची एन्ट्री झाली. त्याने रोमन रेंसवर निशाणा साधत  जे उसोला मॅच खेळण्याचे चॅलेंज दिले. त्यानंतर एडम पीयर्सल राजी करुन तो जे उसोसोबतची फाईट अधिकृत करण्यात यशस्वी ठरला. 

माजी WWE चॅम्पियन आणि आयोजकांमध्ये खटके उडाल्याची चर्चा

केविन ओवेंस vs जे उसो मैचनंतर रोमन रेंसनं केली केविनची धुलाई

SmackDown च्या  मेन इव्हेटमध्ये केविन ओवेंस आणि जे उसो यांच्यातील लढतीमध्ये केविन ओवेंसचा दबदबा दिसून आला. त्याने सहजपणे जे उसोला मात दिली. केविन ओवेंसने लढत संपल्यानंतरही  जे उसोला मारणे सुरुच ठेवले. एवढेच नाही तर जे उसोचे हात रोपच्या दोरीने बांधून त्याच्यावर आक्रमक प्रहार सुरु ठेवले. रिंगमध्ये हे सर्व घडत असतानाही रोमन रेंस बाहेर येत नाही हे पाहून केविनने उसोला स्टेजच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

त्यावेळी रोमन रेंसने त्याच्यावर अटॅक केला. केविनने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर हात बांधलेले असतानाही उसोने आपल्या भावाला साथ दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानेही केविन ओवेंसला मारण्यास सुरुवात केली. रोमन रेंस आणि जे उसोने केविनची अवस्था केविलवाणी केली. दोघांनी त्याला खुर्चीने मारण्यास सुरुवात केली. रोमन रेंसने तर त्याला  LED स्क्रीनवर आपटले. एवढेच नाही तर 20 फूट उंचीवरुन त्याला टेबलावर फेकून दिले.

loading image