WWE सुपर स्टार जॉन सीनानं शेअर केला MSD चा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni and John Cena
WWE सुपर स्टार जॉन सीनानं शेअर केला MSD चा फोटो

WWE सुपर स्टार जॉन सीनानं शेअर केला MSD चा फोटो

WWE सुपरस्टार जॉन सीनाला कोण नाही ओळखत? जॉन सीना त्याच्या इंस्टाग्रामवर मजेदार आणि गोंधळात टाकणाऱ्या पोस्ट करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी त्यानं भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. सीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी हस्तांदोलन करण्यासाठी पायऱ्यांवरून खाली येत असल्याचं दिसत आहे. सीनाने शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन दिलं नाही, पण त्याच्या चाहत्यांनी मात्र त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. धोनी ज्याला हस्तांदोलन करण्यासाठी निघाला आहे तो WWE सुपरस्टार असू शकतो, अशा आशयाच्या विनोदी कमेंट त्यावर चाहत्यांनी केल्या आहेत.

'एमएसडी मीटिंग जेसी' (MSD meeting JC) अशी एका चाहत्याने टिप्पणी केली आहे, तर दुसरा म्हणतो की, हे दोन दिग्गज हस्तांदोलन करतानाचा फोटो आहे. याआधीही सीनाने विराट कोहली आणि शाहरुख खानचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 'YOU CAN'T SEE ME' (तुम्ही मला पाहू शकत नाही) हे जॉन सीनाचं गेस्चर प्रसिद्ध आहे. पण बऱ्याचदा या गेस्चरवरती जोक बनत असतात. 16 वेळचा हा WWE चॅम्पियनन स्वत: च अनेकदा याबद्दल विनोद करताना दिसतो. खासकरून अलीकडच्या काळात जेव्हा तो रिंगमध्ये कमी दिसतो, कारण त्याने चित्रपटांमध्ये करिअर सुरू केले आहे.

धोनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पण सध्या तो मेंटॉर म्हणून २०२१ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होता. या स्पर्धेत भारताकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण भारत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवू शकला नाही. अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध भारताने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये वर्चस्व राखले खरं पण सुरुवातीच्या लढतींमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारत 'सुपर 12' च्या शेवटी निव्वळ धावगतीत सर्वोत्तम होता, परंतू गुणांच्या बाबतीत पाकिस्तान आणि न्युझीलंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी ही शेवटची टी-20 स्पर्धा ठरली.

दरम्यान या विश्वचषकामध्ये धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा व्हावा, म्हणून स्पर्धा ऐन तोंडावर आली असताना बीसीसीआयने धोनीची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून नेमणूक केली होती. याच स्पर्धेदरम्यानच्या एक मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी धोनी डगआऊटमधून बाहेर येत असताना हा फोटो काढण्यात आला होता. हाच फोटो क्रॉप करून सीनाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकला. यातील धोनीच्या हाताची पोज जॉन सिनाच्या 'YOU CAN'T SEE ME' या पोजशी मिळतीजुळती असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याने तो फोटो पोस्ट केला असावा. एका दिग्गजाने दुसऱ्या दिग्गजाचा पोस्ट केलेला हा फोटो पाहून दोघांचेही चाहते खूश झाले आहेत आणि लाईक्स तसेच कमेंटचा त्यावर पाऊस पडला....

loading image
go to top