करारा जवाब! या धाकड क्रिकेटपटूशी पंगा घेणे ट्रोलरला पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

करारा जवाब! या धाकड क्रिकेटपटूशी पंगा घेणे ट्रोलरला पडले महागात

सोशल मीडियावर युजर्स अनेकदा सेलेब्सला ट्रोल करताना दिसतात. असच एका युजरने महिला क्रिकेटरला ट्रोल केले. मात्र, त्याला धाकड क्रिकेटपटूशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. सडेतोड उत्तर देत महिला क्रिकेटरने ट्रोलरची बोलती बंद केली आहे. सध्या तिचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Yastika Bhatia gives it back to troll who told her not to play T20s)

भारतीय महिला क्रिकेटर यास्तिका भाटिया हिला एका युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण यास्तिका भाटियाने त्याच्यावर पलटवार करत सडेतोड उत्तर दिले.

यास्तिकाच्या ट्विटला उत्तर देताना एका ट्रोलरने लिहिले की, तिने टी-20 क्रिकेट खेळू नये. मात्र, यावर यास्तिक शांत न बसता सडेतोड उत्तर दिले. एका ट्रोलरने ट्विट केले, 'अहो बहिण... T20 खेळू नकोस.'

यावर उत्तर देताना यास्तिकाने लिहिले, 'मग मी तुमच्याप्रमाणे घरी बसून कमेंट पास करू का?' असा संतप्त सवाल उपस्थित केला.

यास्तिका राष्ट्रकुल स्पर्धेच्या (CWG-2022) गेल्या सीजनपासून भारतीय महिला टी 20 आंतरराष्ट्रीय संघाचा भाग नाही. यास्तिका इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत बॅकअप यष्टिरक्षक होती.

टॅग्स :Team India