polard
polardtwitter

CSK च्या पठ्ठ्यामुळेच MI ला पोलार्ड मिळाला

कॅरेबियन खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडिन्सच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूपैकी एक आहे. 2010 पासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसते. वेस्ट इंडिज संघाकडून त्याने फार चमकदार कामगिरी केल्याचे कोणालाही आठवत नसेल, पण मुंबई इंडियन्सकडून (MI) त्याने अनेकदा मॅच विनिंग खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सध्याच्या घडीला त्याच्याशिवाय मुंबई इंडियन्सही कल्पनाच करता येणार नाही. आयपीएल स्पर्धेत पोलार्डला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. (You know How CSK Dwayne Bravo convinced Mumbai Indians to sign Kieron Pollard)

2010 च्या हंगामातील लिलावापूर्वी पोलार्ड चँम्पियन लीगमध्ये खेळला होता. या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळण्यामागची कहाणी खास अशीच आहे. सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळणाऱ्या ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) ने यासंदर्भात खुलासा केलाय. त्याने स्वत: मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटकडे पोलार्डच्या नावाची शिफारस केली होती.

polard
जपानमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; खेळाडूंसाठी IOA आखणार प्लॅन

ब्रावोने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय. तो म्हणाला की, जेव्हा मुंबई इंडियन्सला माझा रिप्लेसमेंट हवा होता त्यावेळी मी पोलार्डचे नाव सांगितले होते. पण त्यावेळी पोलार्ड क्लबकडून खेळत असल्यामुळे ड्वेन स्मिथने माझी जागा घेतली. 2010 मध्ये चॅम्पियन लीगमध्ये पोलार्ड खेळत होता. त्यावेळी मी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंट टीममधील राहुल संघवी आणि रॉबिन सिंग यांना पोलार्डला भेटण्यासाठी बोलावले. ब्रावोच्या सांगण्यावरुन राहुल संघवी आणि रॉबिन सिंग मुंबईहून हैदराबादला आले होते. पोलार्डला करारबद्ध करण्यासाठी त्यांनी 2 लाख अमेरिकन डॉलरची ऑफर दिल्याचे ब्रावोने म्हटले आहे. पोलार्डची आणि या दोघांची भेट हॉटेलच्या लॉबीमध्ये घडवून दिली. एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट पाहून पोलार्ड चक्रावल्याचेही ब्रावोने सांगितले.

polard
ई-पास शिवाय पृथ्वीची भटकंती; पोलिसांनी दाखवला खाक्या

आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन हंगामात ड्वेन ब्रावो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यानंतर तो आता चेन्नईकडून खेळताना दिसते. आयपीएल हंगामात दोन्ही संघात चांगलीच चढाओढ पाहायला मिळत असली तरी मुंबई इंडियन्सला तगडा गडी मिळून देण्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ब्रावोचच हात असल्याचेच समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com