प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yuvraj

प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या बातमीनं क्रीडा विश्वात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक वृत्त संस्था पंजाब केसरी मधून हे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करून त्याला सोडून दिलं आहे. युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. युवराज सिंगने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला असून, कोर्टाने युवराजला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: भारतानं पाकिस्तान सोबत खेळू नये;सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी;पाहा व्हिडीओ

युवराज सिंह यांनी अनुसूचित जातीविरुद्ध अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यामुळे दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी त्यांच्या विरोधात एससी एसटी कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली हांसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. युवराज सिंगने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामीन दिला. दरम्यान, युवराज सिंग हा याच प्रकरणात आज आपल्या सहकाऱ्यांसह हिसारमध्ये पोहोचला होता. युवराज सिंगने कोर्टात आपली ही चूक कबूल केली होती. आपल्याकडून नकळत ही चूक झाल्याचं युवराजने कोर्टात सांगितलं होतं.

Web Title: Yuvraj Singh Arrest For Making False Statement About Scheduled Castes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Yuvraj Singh