esakal | बाकी कुणी नाही.. युवराजचा विश्‍वास धोनीवरच!
sakal

बोलून बातमी शोधा

बाकी कुणी नाही.. युवराजचा विश्‍वास धोनीवरच!

महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत असंख्य सामन्यांमध्ये अशक्‍यप्राय परिस्थितीमधून संघाला जिंकून दिले आहे. पण अलीकडच्या काळात धोनीच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. तरीही, न्यूझीलंडविरुद्धच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यामध्ये संघाला जिंकून देण्याची जबाबदारी धोनीच पार पाडू शकतो.. असा विश्‍वास व्यक्त केला आहे युवराजसिंगनं..! 

बाकी कुणी नाही.. युवराजचा विश्‍वास धोनीवरच!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मँचेस्टर : महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत असंख्य सामन्यांमध्ये अशक्‍यप्राय परिस्थितीमधून संघाला जिंकून दिले आहे. पण अलीकडच्या काळात धोनीच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. तरीही, न्यूझीलंडविरुद्धच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यामध्ये संघाला जिंकून देण्याची जबाबदारी धोनीच पार पाडू शकतो.. असा विश्‍वास व्यक्त केला आहे युवराजसिंगनं..! 

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनीने फारशी कमाल केलेली नाही. किंबहुना, त्याचे यष्टिरक्षणही लौकिकास साजेसं झालेलं नाही.. त्यावरून धोनीवर प्रचंड टीका सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाची अवस्था खूपच नाजूक झाली होती. तेव्हा धोनी मैदानात उतरला. धोनी-हार्दिक पंड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंड्या बाद झाल्यावर रवींद्र जडेजाबरोबर धोनीने महत्त्वाची भागीदारी करत संघाच्या विजयाच्या जवळ नेले. 

बहुतांश टीकाकार धोनीच्या क्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत असले, तरीही युवराजने मात्र धोनीवर पूर्ण विश्‍वास दर्शविला आहे.

loading image