Yuvraj Singh New look | सिक्सर किंग युवीची नवी हेअर स्टाइल, चर्चा तर होणारच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuvraj Singh's New look

सिक्सर किंग युवीची नवी हेअर स्टाइल, चर्चा तर होणारच

Yuvraj Singh New hairstyle : टीम इंडियाचे खेळाडू जितके त्यांच्या खेळासाठी ओळखले जातात तितकेच फॅशन जगतातही त्यांचे वर्चस्व आहे. टीम इंडियातील फॅशन किंवा हेअरस्टाइलचा विचार केला तर आजच्या काळात टीम इंडियाच्या खेळाडूंची एकापेक्षा एक हेअरस्टाइल आहे. पण टीम इंडियाचा युवराज सिंग हा मैदानाबाहेर त्याच्या स्टाईल आणि मस्ती साठी ओळखला जातो. युवराजने टीम इंडियामध्ये फॅशनला नव्या उंचीवर नेले आहे. युवराज सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या नवीन लूकने त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.(Yuvraj Singh's New look)

युवराज सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. चाहतेही हा व्हिडिओ सतत शेअर करताना दिसत आहे. युवराजने या व्हिडिओमध्ये केसांची नवीन स्टाइल शेअर केली आहे. क्लिपमध्ये पूर्णपणे आपला स्वॅग दाखवला आहे. लाल टी-शर्ट आणि काळा चष्मा घातलेल्या युवराजची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. लूकमध्ये युवराज मोठ्या केसांमध्ये दिसत आहे.

युवराज सिंगने 1 मार्चला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. व्हिडिओमध्ये युवराज त्याची आई शबनम सिंगची प्रँक करताना दिसत आहे. युवराज सिंगने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पुन्हा एकदा आईसोबत प्रँक.' त्याने हा व्हिडिओ आईच्या इन्स्टाग्रामवरही टॅग केला आहे. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

युवराजचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. 2007 T-20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाचा तो सर्वात मोठा हिरो होता. युवराजने भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषकात युवराज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देखील होता. युवराज सिंगने 2019 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.

Web Title: Yuvraj Singh New Hairstyle Look Video Goes Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..