युवराज म्हणतो, आता तरी खेळू द्या !

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

भारतीय क्रिकेट संघाचा 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा नायक युवराजसिंगने आपल्या 18 वर्षांच्या लढाऊ कारकीर्दीनंतर 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केली. निवृत्तीनंतर या अनुभवी ऑलराउंडरने बीसीसीआयकडे विदेशी टी -20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा नायक युवराजसिंगने आपल्या 18 वर्षांच्या लढाऊ कारकीर्दीनंतर 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केली. निवृत्तीनंतर या अनुभवी ऑलराउंडरने बीसीसीआयकडे विदेशी टी -20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे. 

युवराज म्हणाला, " मला टी -20 क्रिकेट खेळायचे आहे. आता मला अशा प्रकारचे क्रिकेट खेळून माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. माझे आजपर्यंतचे आंतरराष्ट्रीय करियर, कामगिरी आणि आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांबद्दल विचार करणे माझ्यासाठी आता खूपच तणावपूर्ण होत आहे." 

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने युवराजसिंगच्या या परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे याची पुष्टी केली आहे. अनेक  टी-20  लीग्स युवराजला त्यांच्या स्पर्धांमध्ये घेण्यास उत्सुक आहेत. आता युवराजच्या या मागणीवर बीसीसीआय काय भुमिका घेते हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Singh Seeks NOC From BCCI To Play Foreign T20 Leagues