
'दिल्लीचा तो छोटा मुलगा' म्हणत युवराजने कोहलीला लिहिले भावनिक पत्र
नवी दिल्ली: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक भावनिक पत्र लिहिले. त्याने यात विराट कोहलीचा खेळाडू आणि व्यक्ती म्हणून कसा तयार होत गेला हे सांगितले. युवराजने या पत्रात विराट कोहलीच्या चिकाटी आणि शिस्तीबद्दलही आपले भाष्य केले आहे. विराट पुढच्या पिढीसाठी एक आदर्श असल्याचेही युवराज या पत्रात म्हणतो. (Yuvraj Singh Wrote emotional letter to Virat Kohli)
हेही वाचा: CSKचा 'हा' खेळाडू म्हणतो, IPL लिलावात जनावर असल्यासारखे वाटते
युवराज सिंग विराटला लिहिलेल्या भावनिक पत्रात (Yuvraj Singh Emotional Letter to Virat Kohli) लिहितो की, 'विराट मी तुझी एक क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून होत असलेली वाढ जवळून पाहिली आहे. भारतीय संघातील दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून नेटमध्ये खेळणारा तो मुलगा आता स्वतः दिग्गज झाला आहे. तो आता पुढच्या पिढीचा आदर्श बनला आहे. तुझी नेटमधील शिस्त, मैदानावरील उत्साह, खेळातील चिकाटी आजच्या मुलांना प्रोत्साहित करतात. त्यांना देशासाठी खेळण्यासाठी आणि निळी जर्सी घालण्यासाठी प्रेरित करते.'
हेही वाचा: बीसीसीआय वृद्धीमान साहा प्रकरणाची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत करणार?
युवराज आपल्या पत्रात पुढे लिहितो की, 'तू तुझा क्रिकेटचा (Cricket) स्तर प्रत्येक वर्षी वाढवला आहे. तू या महान खेळात बरेच काही कमावले आहेस. तू एक दिग्गज कर्णधार आणि नेतृत्व म्हणून उदयास आलास.तुझ्यामधील आग कधीही विझली नाही. तू एक सूपरस्टार आहेस. तूझ्यासाठी एक स्पेशल शूज. देशाचा अभिमान असाच वाढवत रहा.'
युवराज सिंगने विराट कोहलीला या भावनिक पत्रासोबतच एक शूज देखील भेट म्हणून दिला आहे. हा प्यूमा कंपनीचा स्पेशल एडिशन गोल्डन बूट आहे.
Web Title: Yuvraj Singh Wrote Emotional Letter To Virat Kohli Gift Him Golden Boots
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..