esakal | "मी उदास होतो, धनश्रीने मला समजावलं की..."; चहलची कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanashree-Yuzi-Chahal

"मी उदास होतो, धनश्रीने मला समजावलं की..."; चहलची कबुली

sakal_logo
By
विराज भागवत

टी२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून चहलला वगळलं

T20 World Cup 2021: युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी काल भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टी२० संघात रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या दोन फिरकीपटूंना संधी देण्यात आली. पण आश्चर्याची बाब म्हणजे, अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात स्थान देण्यात आले नाही. चहलची गेल्या तीन-चार वर्षातील टी२० आणि वन डेमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. असे असूनही त्याला संधी का नाकारण्यात आले. या गोष्टीने त्यालाही वेदना झाल्या पण पत्नी धनश्रीने त्याला समजावलं आणि सावरलं, असं त्याने सांगितले.

हेही वाचा: T20 World Cup: चहलला का वगळलं? निवड समितीने सांगितलं कारण

"संघ जाहीर झाला. त्यात माझं नाव नव्हतं. त्यानंतर मी खूप उदास झालो. मला अनेकांचे फोन, मेसेज आले. त्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे हे पाहून खूप बरं वाटलं. जेव्हा तुम्ही उदास असता तेव्हा तुमचे जवळचे लोकच तुम्हाला मदतीला येतात. IPL च्या पहिल्या टप्प्यापासूनच वाईट फॉर्मची चिंता माझ्या मनात होती. पण धनश्रीने मला मदत केली. ती माझ्यासोबत चर्चा करायला बसली आणि तिने मला समजावलं की प्रत्येकच सामन्यात बळी टिपता येतीलच असं नाही. ही केवळ एक छोटा वाईट टप्पा आहे. या टप्पा लवकरच निघून जाईल. तिच्या त्या बोलण्याचा मला खूप आधार मिळाला आणि मी स्वत:ला सावरू शकलो", असं चहलने एका मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा: "तो बात ऐसी है की..."; चहलच्या पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल

चहलची संघाच निवड झाली नाही, त्यानंतर धनश्रीने एक छान मेसेज पोस्ट केला होता. "आई नेहमी म्हणते की ही (वाईट) वेळही एक दिवस निघून जाईल. ताठ मानेने जग. कारण प्रतिभा आणि चांगली कर्म कायम तुमची साथ देतात. त्यामुळे आता गोष्ट अशी आहे की हे वाईट दिवसही नक्कीच जातील आणि चांगले दिवस येतील. कारण देव महान आहे", अशा आशयाची इन्स्टा-स्टोरी तिने ठेवली होती.

loading image
go to top