Yusuf Pathan : युसूफ पठाणची फलंदाजी पाहून रडला पाकिस्तान, मोहम्मद आमिरची केली धुलाई, Video

Yusuf Pathan Zim Afro T10 League
Yusuf Pathan Zim Afro T10 League
Updated on

Yusuf Pathan Zim Afro T10 League : भारताचा माजी खेळाडू युसूफ पठाण त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आजही त्याच्या नावावर असे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत जे कोणीही फलंदाज मोडू शकलेले नाहीत. युसूफ पठाण फलंदाजी करतो तेव्हा समोरच्या संघाला घाम फुटतो.

त्याने अनेक सामने स्वबळावर फिरवले आहेत. जिम एफ्रो टी10 लीगमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यादरम्यान शुक्रवारी त्याने असेच काही केले. जेव्हा त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

खासकरून पठाणने पाकिस्तानचा स्टार गोलंदाज मोहम्मद आमीरचा खरपूस समाचार घेतला. 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकणाऱ्या युसूफ पठाणने या सामन्यात मोहम्मद अमीरच्या एका षटकात 24 धावा केल्या. 40 वर्षांचा भारतीय खेळाडू त्याची अशी धुलाई करेल, असे अमीरला स्वप्नातही वाटले नसेल.

Yusuf Pathan Zim Afro T10 League
Robin Uthappa : 6,6,6,6,6,6,4,4... रॉबिन उथप्पाने झिम्बाब्वेमध्ये घातला राडा! 36 चेंडूत ठोकल्या 88 धावा

झिम्बाब्वेमध्ये पठाणचे वादळ

जिम एफ्रो टी10 लीगचा पहिला क्वालिफायर सामना झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब डर्बन कलंदर विरुद्ध जोबर्ग बफेलोज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात जॉबर्ग बफेलोजला विजयासाठी 10 षटकात 141 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉबर्ग बफेलोजची टीम खूपच अडचणीत दिसली. 57 धावांवर त्याने 4 विकेट गमावल्या होत्या. त्याचवेळी सामन्यात फक्त 5 षटके शिल्लक होती.

जॉबर्ग बफेलोज हा सामना हरेल असे सर्वांना वाटत होते, पण या परिस्थितीत युसूफ पठाण फलंदाजीला आला आणि त्याने एक चेंडू राखून सामना जिंकला. पठाणने या सामन्यात अवघ्या 26 चेंडूत 80 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले.

Yusuf Pathan Zim Afro T10 League
WI vs IND 2nd ODI : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय! 'त्या' फ्लॉप खेळाडूचा पत्ता कट, 'या' दिग्गजला देणार संधी?

सामन्यातील आठवे षटक टाकण्यासाठी मोहम्मद अमीर आला. पठाणने त्या षटकात अमीरला 24 धावा फटकावल्या. त्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर त्याने अमीरला दोन लांब षटकार ठोकले. यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. अमीरने पाचवा चेंडू वाईड फेकला. त्याने हा चेंडू पुन्हा फेकला ज्यावर पठाणने दोन धावा घेतल्या. अखेर सहाव्या चेंडूवर पठाणने पुन्हा फलंदाजी करत त्या चेंडूवर चौकार मारला.

आमिरने सामन्यातील सर्वात महागडे षटक टाकले. जॉबर्ग बफेलोजने युसूफ पठाणच्या सहाय्याने 6 गडी राखून जिंकला. या विजयासह त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत त्यांचा सामना डर्बन कलंदरशी होणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना जिंकून डर्बन कलंदर्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com