पोटाचा घेर वाढलाय? 'या' टिप्स तुम्हाला ठरतील फायदेशीर

वृत्तसंस्था
Friday, 22 November 2019

आज आपण पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहार काय असेल, याचा विचार करणार आहोत. त्यासाठी आम्ही इथं काही टिप्स देत आहोत.

मुंबई : हल्ली सगळ्यांनाच सडपातळ व्हायचंय. बैठं काम, व्यायामाचा अभाव यामुळं अनेकांच्या पोटाचा घेर वाढलाय. आता हा घेर कसा कमी करायचा? असा प्रश्न त्यातल्या प्रत्येकापुढं आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकदा इंटरनेटचा वापर केला जातोय. त्यावर मिळणाऱ्या टिप्स पाहिल्या जातात. जेवढ्या वेगानं त्या पाहिल्या जातात तेवढ्या वेगानं त्याकडं दुर्लक्षही केलं जातं.

पण, आज आम्ही तुम्हाला ज्या टिप्स सांगणार आहोत. त्या तुम्ही फॉलो केल्या तर, निश्चितच तुमच्या पोटाचा घेर कमी होईल. मुळात पोटाचा घेर कमी करणं आणि वजन कमी करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टीत आहार आणि व्यायाम वेगवेगळे असतात. आज आपण पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहार काय असेल, याचा विचार करणार आहोत. त्यासाठी आम्ही इथं काही टिप्स देत आहोत.

1. फॅट्स बर्न करताना आहारतून तुम्ही तेलकट पदार्थांना दूर करा. त्याऐवजी भाजलेलेल्या पदार्थांवर भर द्या. तळलेले पदार्थ शरिरात फॅट्सचे प्रमाण वाढवतात. हे फॅट्स पोटावरच दिसू लागतात. 

2. तुम्हाला कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय असेल तर, ते पूर्ण पणे टाळा. त्याचबरोबर मिठाई आणि दारू या गोष्टीही बंद कराव्या लागतील. 

3. आईस्क्रिमही तुमच्या शरिरात फॅट्स वाढण्यासाठी मदत करत असतं. त्यातून तयार झालेले फॅट्स कमी होण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळं आईस्क्रिम टाळाच. 

4. बदामात पाच ग्रॅम प्रोटिन असते. ते रात्री तुमचे मसल्स रिपेअर करण्यास मदत करते. शरिरातील चर्बी कमी करण्यासाठी बदाम सूपरफूड मानले जाते. बदामातील फायबर तुमच्या शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. 

5. पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते. या भाज्यांचे सेवन तुम्हाला चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. या भाज्यांमध्ये कॅलरीज् नसल्यामुळे तुम्ही त्या भाज्या बिनधास्तपणे कितीही खाऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to burn belly fats information in marathi