esakal | उत्खननात सापडलं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट! जाणून घ्या सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

old toilet

उत्खननात सापडलं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट! 'हे' आहे सत्य

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पूर्वीच्या काळी साधारण हजार वर्षांपूर्वी तेव्हाचे नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असं आपल्याला वाटते. कारण याचा उल्लेख कधी कोणीच केला नसावा.. मात्र हे खरं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये (jerusalem) एका पुरातन टॉयलेट (2700 old toilet) सापडलं आहे. या शहरात सतत उत्खनन करताना हे टॉयलेट संशोधकांना सापडले आहे.

27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट...

सध्या आपल्याला इंडियन आणि दुसरं वेस्टर्न हे दोनचं टॉयलेटचे प्रकार माहित आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शेतात किंवा मोकळ्या मैदानावर शौचासाठी जातात. पण सरकारच्या स्वच्छ भारत योजनेमुळे गेल्या काही वर्षांपासून घरोघरी शौचालय बांधले जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का...पूर्वीचे लोकं कुठे जात असतील शौचास...किंवा त्याबाबत काही माहिती नसेल तर ही बातमी वाचाच.. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये (Ancient toilet found in Jerusalem) एका पुरातन टॉयलेट सापडलं आहे. जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात सतत उत्खनन सुरु असतं. वेगवेगळ्या काळातील संस्कृतींचा अभ्यास त्यातून केला जातो. या उत्खननात नुकतंच एक टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट असून ते अति श्रीमंत व्यक्तीनंच बांधलं असण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत.

श्रीमंतांचं टॉयलेट पाहून व्हाल थक्क

साधारण 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट प्रचंड खर्च करून आणि अनेक मजुरांच्या मेहनतीनं हे बांधल्याचं दिसतं. हे एक मोठं न्हाणीघर असून टॉयलेट हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी हे टॉयलेट सापडलं तिथं एक भलीमोठी राजवाड्यासारखी इमारत होती. तिथं राहणाऱ्या एखाद्या शौकीन श्रीमंतानं हे टॉयलेट बांधलं असण्याची शक्यता आहे.

असं हे टॉयलेट

बसायला सुटसुटीत... अन् मलमुत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा खणल्याचं दिसतं. खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहे. त्यावरून 27 हजार वर्षांपूर्वी कुठले प्राणी अस्तित्वात होते, त्यावेळची खाद्यसंस्कृती कशी होती वगैरे बाबींचा शोध घेतला जाणार आहे.

loading image
go to top