Numerology : नवीन वर्षाचा शेवटचा दिवस का आहे खास? तुमच्या आयुष्यावर कसा पडणार प्रभाव?

अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाचा विशिष्ट असा अर्थ आहे. जेव्हा अंक 123 अशा पॅटर्न किंवा समूहामध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकत्रित संदेश हा वेगळा ठरतो.
Numerology 31st December
Numerology 31st DecembereSakal

Numerology 31st December : या वर्षाचा शेवटचा दिवस हा अगदी खास असणार आहे. वर्षाची शेवटची तारीख जर नीट पाहिली, तर अंकांचा एक विशिष्ट पॅटर्न यामध्ये असल्याचं तुम्हाला दिसून येईल. 12/31/23 या तारखेमधील अंक हे 123123 असे होत आहेत. यामुळे अंकशास्त्रानुसार याचा प्रभाव संपूर्ण जगातील नागरिकांवर पडणार आहे.

अंकशास्त्रामध्ये (Numerology) प्रत्येक अंकाचा विशिष्ट असा अर्थ आहे. जेव्हा अंक 123 अशा पॅटर्न किंवा समूहामध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकत्रित संदेश हा वेगळा ठरतो. अंकशास्त्रानुसार 123 या अंकाचा अर्थ समजून घ्यायचा झाल्यास, आधी आपल्याला 1,2 आणि 3 या अंकांचे अर्थ समजणं गरजेचं आहे.

1 - अंकशास्त्रानुसार एक हा अंक नवीन सुरुवात दर्शवतो.

2 - अंकशास्त्रानुसार दोन हा अंक भावनिकता आणि चांगली वेळ दर्शवतो.

3 - अंकशास्त्रानुसार तीन हा अंक नवीन गोष्टी शिकणे आणि वाढ दर्शवतो.

यामुळेच 123 हा अंक असं सांगतो, की एखादी नवीन गोष्ट सुरू करा, त्याचा आनंद घ्या आणि नवीन गोष्टी शिकून स्वतःची वाढ होण्यावर भर द्या. एखाद्या नव्या बिझनेसची सुरुवात असेल, नवीन गोष्ट शिकण्याची सुरुवात असेल वा वैयक्तिक पातळीवर काही नवीन गोष्ट करण्याची सुरुवात असेल. यापैकी कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची ग्रोथ करू शकता.

Numerology 31st December
Party Looks : न्यू इयर पार्टीसाठी असा करा लूक, हटके लूकचं सगळेच करतील कौतूक

एखाद्या संख्येचा अर्थ (Meaning of a Number) शोधण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्यातील अंकांची बेरीज. ही बेरीज तोपर्यंत करायची, जोपर्यंत एक अंकी संख्या येत नाही. 1+2+3 याची एकूण बेरीज 6 होते. अंकशास्त्रानुसार सहा हा अंक पोषण, समतोल आणि प्रेम दर्शवतो.

हा दिवस खास का?

यावर्षीच्या शेवटच्या दिवशी 123 या अंकांचा पॅटर्न रिपीट होत आहे. त्यामुळे अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, नवनिर्मितीसाठी दुप्पट सकारात्मक उर्जा मिळणार आहे. जरी 31/12/23 ही संख्या वेगवेगळी पाहिली, तर मात्र थोडा वेगळा अर्थ येत आहे. 12 हा अंक तुमच्या खऱ्या आकांक्षा दर्शवतो, तर 23 हा अंक मजबूत आणि स्थिर उर्जा दर्शवतो. 31 हा अंक मात्र नियोजित गोष्टी होणार नसल्याचं दर्शवतो. त्यामुळे या दिवशी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com