
डॉ. समीरा गुजर-जोशी
मैत्रिणी, आज ३१ डिसेंबर! २०२४ या वर्षाचा हा शेवटचा दिवस. २०२४ मध्ये दर मंगळवारी आपली भेट ठरलेली होती. मला अजून आठवतं आहे, पहिला लेख मी रेल्वे प्रवासात मोबाइलवर टाइप करून लिहिला होता! खूप दिवसांनी पुन्हा एकदा स्तंभलेखन करत होते. आजच्या माझ्या वयाच्या मुलींशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून तुझ्या माझ्यात दडलेली ‘फुलराणी’ शोधावी, तिला फुलण्यासाठी मदत होईल असं काहीतरी या लेखांतून मांडता यावं असा विचार मनात होता; पण दर आठवड्याला या विचाराला धरून लिहिणं जमेल ना, अशीही मनात धाकधूक होती.