Tulsi
TulsiEsakal

Winter Health: रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

थंडीत राहील स्वस्त
Published on

सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर गेली दोन दिवस थंडीला सुरुवात झाली आहे. ऊबदार कपडे, पायमोजे याची आता सर्वांची शोधाशोध सुरु झाली असेल. थंडीच्या दिवसात सर्दी- खोकला असे आजार उध्दभवतात. अशावेळी तुळशीची पाने खाणे शरीरासाठी फायदेमंद असते. ही पाने तुम्ही चहात टाकूनही पिऊ शकता. याबरोबरच रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्याने शरीराला याचा खुप फायदा होतो. तुळशीच्या पानात गुणकारी तत्व असतात. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय ही पाने खाण्याचे पाच फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊया.

मेटाबाॅलिजम : तुळशीची पाने आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. ते चयापचय सिस्टम दुरुस्त करण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीची पाने खाण्याने अॅसिडिटी, गॅस दूर होते. पचनक्रिया सुधारते.

बाॅडी डिटाॅक्सीफिकेशन : तुळशीच्या पानात बाॅडी डिटाॅक्स करण्याची क्षमता असते. यातील गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

तोंडाचे बॅक्टेरिया घालवतो:

तुळशीची पाने तोंडात लपलेले बॅक्टेरिया साफ करतात. हे पान तोंडात टाकल्याने श्वासात ताजेपणा जाणवतो.

सर्दी-खोकला

थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला हे संसर्गजन्य आजार होतात. अशावेळी तुळशीची पाने नियमित खाल्याने या आजारापासून लढण्यास मदत होते.

तणाव कमी करतो: तुळशीची पाने नियमित खाण्य़ाने तणाव दूर होतो.पानांमध्ये अॅडाप्टोजेन असतात जे मानसिक तणाव कमी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com