Liver Care: सकाळी दिसणाऱ्या 'या' 5 समस्या असू शकतात यकृतावर सूज येण्याचे लक्षण, वेळीच घ्या उपचार

Liver Care: यकृतातील सूज वाढल्याने यकृताचे कार्य योग्य प्रकारे करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे सकाळी दिसणाऱ्या काही लक्षणांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.
Liver Care:
Liver Care:Sakal
Updated on

Liver Care: फॅटी लिव्हर हा आजार हा चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवतो. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये ज्या व्यक्तीचा यकृताचा त्रास होतो त्याच्या लिव्हरमध्ये सूज वाढते. यकृतावर सूज येण्याचे एक प्रमुख कारण जास्त चरबीयुक्त आहार घेणे आहे. जे लोक जास्त तेल किंवा चरबीयुक्त, तळलेले खाद्यपदार्थ खातात त्यांना फॅटी लिव्हर आजाराचा धोका जास्त असतो.

यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याचे मुख्य कार्य अन्न पचवणे आणि शरीरातील जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढणे हा आहे. तसेच याशिवाय यकृत रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील साखरेचा संचय करण्यास मदत करते.

जेव्हा यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा यकृताला या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होते. त्याचप्रमाणे, जेव्हा यकृताच्या कार्याशी संबंधित समस्या वाढतात, तेव्हा यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. वाढलेल्या चरबीमुळे यकृताचा आकार वाढू लागतो आणि यकृताला सूज येऊ लागते. जेव्हा यकृताची सूज वाढू लागते, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. चला तर मग जाणून घऊया यकृतावर सूज आल्यास कोणती लक्षणे दिसतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com