New Year Resolution : नव्या वर्षात नवा संकल्प, पुस्तकांच्या प्रेमात पडा; या टीप्स वाढवतील वाचनाची आवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Resolution

New Year Resolution : नव्या वर्षात नवा संकल्प, पुस्तकांच्या प्रेमात पडा; या टीप्स वाढवतील वाचनाची आवड

New Year Resolution : पुस्तके वाचणे ही आवड कधीही फायद्याचीच. मात्र गेल्या दोन वर्षात पुस्तके वाचण्याचा दर तुलनेत कमी झाल्याचे आढळून आले. ही बाब खरं तर चिंताजनक आहे. खरं तर, 2021 च्या सुरुवातीला, जवळजवळ एक चतुर्थांश अमेरिकन लोकांनी प्यू रिसर्च सेंटरला सांगितले की त्यांनी मागील वर्षभरात कोणतीही पुस्तके वाचली नाहीत. गेल्या वर्षी गॅलपच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की जे लोक पुस्तके वाचत होते ते देखील पूर्वीपेक्षा कमी वाचत आहेत.

तेव्हा नव्या वर्षात पुस्तके वाचण्याचा नवा संकल्प घेण्यास काहीही हरकत नाही. पुस्तके वाचल्याने तुमचे ज्ञान तर वाढतेच पण त्याचबरोबर तुमची एकाग्रताही वाढते.

अनेक लोकांनी सर्वेमध्ये असे सांगितले की, ते आधी पुस्तकांचे उत्तम वाचक होते आणि नंतर ते त्यातून बाहेर पडले,” @nypl च्या रीडर सर्व्हिसेसचे सहयोगी संचालक लिन लोबाश यांनी गेल्या काही वर्षांतील संभाषणे सांगताना एका लेखकाजवळ ही खंत व्यक्त केली. "एकदा हरवल्यानंतर सरावात परत येणे कठीण आहे." तेव्हा नव्या वर्षात पुस्तक वाचनाची गोडी लावा. (Books)

असे पडा पुन्हा वाचनाच्या प्रेमात

Vox च्या @alissawilkinson द्वारे संकलित केलेल्या तज्ञांच्या या 5 टिप्स वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उत्तम आहे.

१) पुस्तक तुमच्या फोनच्या बाजूला ठेवा

तुम्ही फोन ठेवता अगदी त्याच्या शेजारी वाचनाचे पुस्तक ठेवा. म्हणजे तुमची नजर त्या पुस्तकावर सहज पडेल. मात्र तुम्ही त्यांनतर फोन उचलता की पुस्तक हे तुमच्यासाठी खरं टास्क ठरेल. मात्र तुम्हाला सुरूवातीला कठीण गेलं तरी हाती वाचायला पुस्तकच घ्यायचं आहे.

२) पुस्तकांचे वेगवेगळे फॉर्मट्स एक्सप्लोर करा

तुम्हाला टीपिकल पद्धतीचे पुस्तक वाचणे रटाळवाणे वाटत असेल तर तुम्ही इ-बुक हाताळा. साधीसोपी कामे जसे की भांडे धुताना तुम्हाला ऑडिओबुकही आवडेल. याने तुमचा माइंड फ्रेश होईल. दुसऱ्या दिवशी परत पुस्तक उघडून बसा. तुमची वाचनाची गोडी नक्कीच वाढली असेल. (Personality Developement)

हेही वाचा: Book Reading : स्ट्रेस आलाय? पुस्तकं वाचा अन् ताण घालवा

३) लायब्ररीला विसरू नका

लायब्ररी म्हणजे केवळ फिजीकली तेथे जाऊन पुस्तके वाचणे एवढंच उरत नाही. लायब्ररीची पुस्तकं आता तुम्ही लायब्ररीत न जाता इ-बुक्सच्या रुपातही उपलब्ध आहेत. कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण आता त्याचे अॅप्सही उपलब्ध आहेत. त्याची नावे आहेत लिब्बी अँड ओव्हरड्राइव्ह (Libby And Overdrive)

४) स्वत:ला असाइनमेंट द्या

रोज स्वत:ला टास्क द्या. आणि टास्कमध्ये तुम्ही तुमचं मंथली रीडींग गोल सेट करा.

५) तुम्हाला हवं ते वाचा

तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी आवर्जून वाचा. त्यातच गोडी निर्माण करा.