ब्रेकअप के बाद! नवीन रिलेशनसाठी 'या' गोष्टी कधीच विसरु नका

पुन्हा नव्याने प्रेमात पडताना करा 'या' गोष्टींचा विचार
ब्रेकअप के बाद! नवीन रिलेशनसाठी 'या' गोष्टी कधीच विसरु नका

प्रेम.. हा शब्द दिसायला किती लहानसा वाटतो ना. पण एकदा का तुम्ही या प्रेमात पडलात की त्या शब्दाची खोली तुम्हाला जाणवू लागते. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांसोबत फिरत रहाणं, फोनवर तासनतास गप्पा मारत राहणं किंवा भावी आयुष्याची स्वप्न रंगवत बसणं इतकंच नसतं. प्रेम म्हणजे त्याग, समर्पण, आपलेपणा आणि त्याहून महत्त्वाचं असतं ते म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास. जर नात्यात विश्वास असेल तर ते नातं दूरपर्यंत तुमची साथ देतं आणि तर अर्ध्यावरच हा डाव मोडतो. सध्याच्या काळात नवी नाती जोडण्यापेक्षा नात्यात आलेला दुरावा, वाद याच गोष्टी कायम कानावर येतात. आजकाल पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी एकमेकांचा इगो आड येतो आणि प्रेमाचं नातं संपुष्टात येतं. त्यामुळे अनेकदा ब्रेकअप (breakup) झाल्यानंतर पुन्हा नव्या व्यक्तीच्या प्रेमात पडतांना काही जण असंख्य वेळा विचार करतात. काहींना नवी नाती जोडण्याची भीती वाटते. तर, काहींचा प्रेमावरचा विश्वासच उडतो. म्हणूनच, ब्रेकअप झाल्यानंतर नव्या प्रेमात पडत असतांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊयात. (5-tips-get-back-dating-and-starting-over-someone-new-after-breakup)

ब्रेकअप के बाद! नवीन रिलेशनसाठी 'या' गोष्टी कधीच विसरु नका
भर मांडवात नवराई रुसली; होणाऱ्या पतीचा केला असा अपमान

१. झालं गेलं विसरुन जा -

हो. तुमच्या आयुष्यात यापूर्वी काय झालंय ते सारं काही विसरुन जा. तुमचा भुतकाळ, ब्रेकअप याला कायमचा पूर्णविराम द्या आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करा. घडून गेलेलं सारं काही विसरुन पुढे जाणं हीच नव्या नात्याची पहिली पायरी आहे. तसंच ज्या चुका आधी घडल्या त्या नव्या नात्यात घडणार नाहीत याचीही काळजी घ्या.

२. असुरक्षिततेची भावना -

अनेक जणांना नव्या नात्यात येतांना असुरक्षितेची भावना असते. काही अंशी ते योग्यदेखील आहे. मात्र, समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना सामोरं जाणं आणि प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, तुमच्या मनातील चलबिचलता, नकारात्मकता या गोष्टींचा परिणाम कधीच तुमच्या नात्यावर होऊ देऊ नका. पूर्ण आत्मविश्वास आणि नव्या उमेदीने पुन्हा प्रेमात पडा आणि समोरच्या व्यक्तीला आपलंस करा.

३. स्वत:वर प्रेम करा -

अनेक जण ब्रेकअप झाल्यावर अस्वस्थ होतात आणि नव्या प्रेमाच्या शोधात निघतात. परंतु, हे अत्यंत चुकीचं आहे. घाईघाईत निर्माण केलेलं नातंदेखील कधीच शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर प्रथम स्वत:ला वेळ द्या. जे घडून गेलं त्याचा नीट विचार करा आणि या चुका पुढे आयुष्यात कधीच करायच्या नाहीत याची खूणगाठ बांधा. तसंच ब्रेकअपनंतर सॅड सॉन्ग ऐकणं बंद करा. त्यामुळे तुमच्या मनात आणखी नकारात्मकता निर्माण होते.

४. एकटे राहू नका, चारचौघात मिसळा -

ब्रेकअपनंतर कधीच एकटे राहू नका. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढतो. कायम मित्रांच्या घोळक्यात रहा. सोडून गेलेली व्यक्ती तुमच्यासाठी कितीही प्रिय असली किंवा तिचं तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलं तरदेखील त्यांच्या आठवणी विसरुन जा. मित्र-परिवारात राहा. त्यामुळे संबंधित व्यक्तीसोबत तुमचा निर्माण झालेला कन्फर्ट झोन तुटेल आणि तुम्ही समाजात वावरु लागला. तसंच समाजात वावरत असतांना आपोआप तुम्हाला जुन्या गोष्टींचा विसर पडेल.

५. बंधन लादू नका -

प्रेम हे मुक्त आहे. त्याला बंधनामध्ये बांधू नका. जर तुम्ही एखाद्याला बंधनात, अटींमध्ये बांधून ठेवलं तर ते प्रेम तुमच्या हातून कधीच निसटून जाईल. प्रेमात स्वातंत्र्य देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर त्या नात्यात स्वातंत्र्य नक्कीच हवं. जर हे स्वातंत्र्य नसेल तर ते नातं फार काळ टिकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com