ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

दिवसातील सर्वात जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये घालवत असतो. त्यामुळे ऑफिस हे आपलं दुसरं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक ऑफिसमध्ये कलिग्स सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वागत असतात. परंतु, यात अशाही काही व्यक्ती असतात. ज्या कुटुंबाप्रमाणे जरी असल्या तरीदेखील त्यांच्यासाठी मनात एक हळवा कोपरा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर, त्या व्यक्तीवर आपलं क्रश असतं. आता क्रश म्हणजे काय हे वेगळं सांगायला नको. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपुलकी, जिव्हाळा किंवा प्रेम वाटत असतं त्यालाच क्रश म्हणतात. परंतु, जर ऑफिसमध्ये तुमचंही कोणी असं क्रश असेल तर कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात. (5-ways-to-deal-with-an-office-crush)

१. प्रेमाचा अनुभव घ्या -

कोणतीही गोष्ट अनुभवायची असेल तर त्यातील फिलिंग्स समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडू लागली असेल तर सहाजिकच तिच्या मर्जीत राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करु लागतात. तुमच्या ड्रेसिंगमध्ये बदल झाला असतो. त्या व्यक्तीने सतत तुमच्याकडे लक्ष द्यावं यासाठी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता. थोडक्यात तुम्ही प्रेमात पडलात हे त्यामागचे संकेत आहेत.

हेही वाचा: सिंगल फादर आहात? असा मॅनेजर करा ऑफिस, मुलांसाठीचा वेळ

२. फ्लर्टिंग करा -

फ्लर्टिंग करणं म्हणजे मुद्दाम जवळीक साधणं असा त्याचा अर्थ नाही. तर, येथे करण्यात येणारी फ्लर्टिंग ही मैत्रीच्या नात्याने असावी. जर तुम्ही मैत्रीच्या नात्याने फ्लर्टिंग करत असाल तर कोणालाही तुमचा राग येणार नाही. किंवा, कोणी तुमच्याविषयी चुकीचं मतही तयार करणार नाही. त्यामुळे कधीतरी कॉफी मशीन, वॉटर कुलर जवळ तुमची क्रश असेल तर तिथे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्यातील मैत्री अधिक दृढ होईल.

३. रिलेशनशीपविषयी जाणून घ्या -

जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्या आयुष्यात अन्य कोणती दुसरी व्यक्ती तर नाही ना याची माहिती करुन घ्या. जरा त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती असेल तर तुम्ही वेळीच बाजूला झालेलं बरं. कारण, त्यामुळे तुम्हाला व क्रशच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच तुमच्यातील मैत्री तुटूही शकते.

हेही वाचा: तुमचा पार्टनर बालिशपणे वागतो का? जाणून घ्या त्या मागचं कारण

४. तुमच्या भावना इतरांना सांगू नका -

अनेकदा मुलं त्यांच्या क्रशविषयी मित्रांना सांगतात. मात्र, तसं करु नका. कारण, त्यामुळे सगळीकडे याविषयी चर्चा होऊ शकते. आणि, ही चर्चा क्रशच्या कानावर पडली तर तुमच्या मैत्रीत फूट पडू शकते.

५. ऑफिस ग्रुपसोबत बाहेर जा -

आपल्या क्रशसोबत काही वेळ घालवावा असं सगळ्यांनाचा वाटत असतं. मात्र, ते शक्य नाही. अशा वेळी ऑफिस ग्रुपसोबत पिकनिक काढा किंवा बाहेर फिरायला जा. ज्यामुळे तुम्ही क्रशसोबत जास्त वेळ घालवू शकता. या निमित्ताने तुमच्यातील मैत्रीदेखील वाढू शकते.

Web Title: 5 Ways To Deal With An Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top