Travel : जगातील सहा ठिकाणे जिथे कधीच होत नाही सुर्यास्त; रात्रीही तळपतो सूर्य !

जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. चला आज अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे सूर्य कधीच मावळत नाही
Travel
Travelgoogle

पुणे : दिवसापाठोपाठ रात्र आणि रात्रीच्या पाठोपाठ दिवस हे चक्र लाखो वर्ष सुरू आहे. पण तुम्हाला अशी ठिकाणे माहित आहेत का जिथे सूर्य कधीच मावळत नाही ? जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. चला आज अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे सूर्य कधीच मावळत नाही.

नॉर्वे- 76 दिवसांचा दिवस

आर्क्टिक सर्कलमध्ये स्थित नॉर्वेला मध्यरात्री सूर्याची भूमी म्हणतात. येथे मे महिन्याच्या अखेरीपासून जुलैपर्यंत 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्य मावळत नाही. या काळात तुम्ही स्वालबार्डला भेट देऊ शकता.

नुनावुत, कॅनडा- २ महिन्यांचा दिवस

कॅनडाच्या वायव्य प्रदेशात नुनावुत हे आर्क्टिक सर्कलच्या सुमारे दोन अंशांवर स्थित आहे. या ठिकाणी जवळपास दोन महिने सूर्यप्रकाश मिळतो. तर हिवाळ्यात हे ठिकाण सलग 30 दिवस अंधारात असते.

आइसलँड- संपुर्ण उन्हाळ्याचा दिवस

आइसलँड हे ग्रेट ब्रिटननंतर युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. उन्हाळ्यात १० मे पासुन आइसलँडमध्ये जून महिन्याच्या शेवटीपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. मध्यरात्री सूर्य पाहण्यासाठी, तुम्ही आर्क्टिक सर्कलमधील अकुरेरी आणि ग्रिम्से बेट या शहराला भेट देऊ शकता.

बॅरो, अलास्का- ३ महिन्यांचा दिवस

मे महिन्याच्या अखेरीपासून ते जुलै अखेरपर्यंत येथे सूर्य मावळत नाही. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढील 30 दिवस येथे सूर्य उगवत नाही आणि ती ध्रुवीय रात्र म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ हिवाळ्यात संपूर्ण देश अंधारात असतो. बर्फाच्छादित पर्वत आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या हिमनद्यांसाठी लोकप्रिय, हे ठिकाण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात भेट देता येते.

फिनलंड- ७३ दिवसांचा एक दिवस

फिनलंडला तलाव आणि बेटांचा देश म्हणतात. फिनलंडच्या बहुतांश भागात उन्हाळ्यात फक्त 73 दिवस सूर्य दिसतो. या दरम्यान सुमारे 73 दिवस सूर्यप्रकाश पडतो, तर हिवाळ्यात येथे सूर्यप्रकाश दिसत नाही. इथले लोक उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जास्त झोपतात याचे हे देखील एक कारण आहे. या काळात स्कीइंगमध्येही सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. यावेळी तुम्ही काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकता.

स्वीडनमध्ये 6 महिन्यांचा दिवस

मेच्या सुरुवातीपासून ते ऑगस्टच्या अखेरीस, स्वीडनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सूर्यास्त होतो आणि संध्याकाळी 4 वाजता उगवतो. येथे सतत 6 महिने ऊन असते. म्हणजे या देशात ६ महिने सूर्य मावळत नाही. अशा परिस्थितीत, पर्यटक वॉटर स्पोर्ट्स, गोल्फिंग, मासेमारी, ट्रेकिंग ट्रेल्स खेळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com