
अवंती टिळेकर
आपण खात असलेला भाजीपाला, कडधान्ये, फळे या सर्वांचा आपल्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. आपण खात असलेले अन्न सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले असेल, तर साहजिकच त्यातून आपल्याला चांगले अन्नद्रव्य मिळते आणि त्यातून आपल्या आरोग्यात सुधारणा होते, हे मी स्वतः अनुभवले आहे. माझ्यावर ओढवलेल्या मोठ्या आरोग्य संकटातून मी सेंद्रिय अन्नधान्याच्या माध्यमातून बाहेर पडले आहे, त्यामुळे आयटीमधील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.