esakal | पोलिसांनी पूर्ण केलं चिमुकल्याचं स्वप्न; video होतोय व्हायरल

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी पूर्ण केलं चिमुकल्याचं स्वप्न; video होतोय व्हायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

पोलिसांनी पूर्ण केलं चिमुकल्याचं स्वप्न; video होतोय व्हायरल
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. तर, काही व्हिडीओ कायमस्वरुपी स्मरणात राहतात. यात लहान मुले आणि प्राण्यांचे व्हिडीओ कायमच चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. युएई पोलिसांनी एका चिमुकल्याची इच्छा पूर्ण करत त्याला थक्क करणारं सरप्राइज दिलं आहे.

अबूधाबी येथे राहणारा एक चिमुकला गंभीर आजाराने त्रस्त असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. याच काळात या चिमुकल्याची इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याची इच्छा होती. परंतु, त्या काळात या चिमुकल्याच्या कुटुंबियांना ही कार खरेदी करणं शक्य नव्हतं. या घटनेची माहिती अबुधाबी पोलिसांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे सध्या सर्वत्र अबुधाबी पोलिसांचं कौतुक होत आहे.

मोहम्मद-अल-हरमोउदी असं या चार वर्षाच्या मुलाचं नाव असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मोहम्मद-अल-हरमोउदीला इलेक्ट्रीक कारचं प्रचंड वेड असून अबूधाबी पोलिसांनी त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ त्याचं स्वप्नचं पूर्ण केलं नाही, तर त्याला पोलिासांच्या गाडीत बसवून संपूर्ण शहरदेखील फिरवून आणलं. विशेष म्हणजे यावेळी या चिमुकल्याला पोलिसांनी त्यांची कॅपदेखील घालायला दिली होती. 

दरम्यान, हा व्हि़डीओ अबूधाबी पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळाले असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.