AC Side Effects :  दुखणं मागं लावण्याची बेस्ट ऑफर! दिवसभर AC ची हवा खा आणि...

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते
AC Side Effects
AC Side Effectsesakal

 AC Side Effects : उन्हाळ्याला सुरूवात झाली असून येत्या काही दिवसांत कडक ऊन पडणार आहे. लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी विविध उपाय करतात. अलीकडे देशात एसीची मागणी वाढली आहे.

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक घरांमध्ये एसीचा वापर करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त वेळ एसीमध्ये राहण्याचेही अनेक दुष्परिणाम होतात.

वाढत्या तापमानासह उन्हाळ्याचे आगमन झाले आहे. बदलत्या हवामानासोबत आता आपली जीवनशैलीही बदलत आहे. बदलत्या ऋतूने खाण्यापिण्यापासून ते पेहरावापर्यंत सर्व काही बदलले आहे उन्हाळा येताच लोकांनी एसीचा वापर सुरू केला आहे. या ऋतूमध्ये दिवसभर एसीतच राहणारे अनेकजण असतात.

AC Side Effects
T-shirt AC : आता लागणार नाहीत घामाच्या धारा; ACचा गार वारा सोबत घेऊन फिरा

सतत एसीमध्ये राहिल्याने ‘सिंड्रोम’ सारखा गंभीर आजार उद्भवत असतो. डोकेदुखी, एकाग्र होण्यात अडचण, कोरडा खोकला, थकवा, वासाची संवेदनशीलता आणि चक्कर येणे किंवा मळमळ यासारखी लक्षणे दिसू लागतात. जर तुम्ही उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी एसी वापरत असाल त्याचे गंभीर परिणामही जाणून घ्या.

एसीची थंड हवा. शरीराला थंडावा देत असली. तरी शरीरातील सर्व आद्रता ते शोषून घेते. त्यामुळे शरीरात असलेले पाणी कमी होते.त्याचा आपल्या त्वचेला पुरवठा होत नाही. यामुळे त्वचा कोरडी पडते.

AC Side Effects
Car Maintain Tips : कडक उन्हाळ्यातही गाडी राहणार Cool ; असा हाताळा तूमच्या कारमधला AC!

एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने त्वचेच्या लवचिकतेवरही परिणाम होतो. त्वचा आकुंचन पावते, त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने वाढू लागते.

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच, जास्त थंड हवेमुळे खोकला, सर्दी इत्यादी श्वसनाचे आजार दिसून येतात.

जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर सतत एसी वापरणे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. वास्तविक, एसीची योग्य स्वच्छता न केल्यामुळे, त्यातील धुळीमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो.

AC Side Effects
Health : इनहेलेशन थेरपीचा प्रसार ; भारतातील अस्थम्याच्या समस्येवरील रामबाण उपाय

जर तुम्ही दिवसभर एसी सतत वापरत असाल तर त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. खरंतर, वातानुकूलित खोली आणि बाहेरचे तापमान यात खूप फरक असतो. जेव्हा तुम्ही एसीमुळे झालेल्या थंड वातावरणातून बाहेरील गरम तापमानात जाता तेव्हा डोकेदुखी होऊ शकते.

एसीच्या अत्यंत कमी तापमानामुळे मेंदूच्या पेशी आकुंचन पावू लागतात. त्यामुळे मेंदूची क्षमता आणि कार्यप्रणाली प्रभावित होते. यासोबतच सतत एसीत बसल्यामुळे चक्कर येण्याचा त्रासही अनेकांना होतो.

AC Side Effects
Bone Health: Old Age मध्ये हाडं मजबूत हवी असतील तर तरुणपणात नका खाऊ हे पदार्थ....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com