आज हा लेख समुद्राच्या लाटांसारखा आवेगाने आलाय- याचं कारण या समुद्रकिनारी बसून लिहिण्याचा योग जुळून आलाय. म्हणजे आपण ठरवलेली गोष्ट आपण करतोय याचा आनंद निराळाच आहे. महत्त्वाची कामगिरी पार पडल्यानंतर कोणीतरी कौतुक करावं असं वाटणं स्वाभाविक असतं..खरंतर ही अपेक्षा आपल्या माणसांकडूनच असते; पण बऱ्याचदा ती पुरी होत नसेल, तर आपल्या मेहनतीचं बक्षीस हे आपणच आपल्याला द्यायला हवं. इतरांकडून मिळालेली शाबासकी ही माझ्यासाठी बोनस असते. महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडल्यानंतर आपण आपल्याला रिवॉर्ड दिलंच पाहिजे याबाबतीत मी आग्रही आहे. आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असायला हवा. हेच निमित्त साधून सेल्फ रिवॉर्डसाठी मी चक्क सोलो ट्रिपला यायचं ठरवलं आणि मी आलेसुद्धा..इथे समुद्रकिनारी बसून लेख लिहिताना अत्यंत आनंद होतो आहे. इथे आल्यानंतर लक्षात आलं, की बाहेर आल्यानंतर तिथले लोकल कपडे घालण्यात मजा आहे. तिथल्या वातावरणाप्रमाणे पेहराव करण्याची माझाच काही औरच आहे. म्हणून चक्क इथेच कपडे विकत घ्यायचं अस मी ठरवलं. या कपड्यांबरोबर इथल्या ॲक्सेसरीजही कमाल असतात.योग्य ॲक्सेसरीज लूकच आकर्षण वाढवतात. खरंतर ॲक्सेसरीज म्हणजे फॅशनचा आत्मा आहे. नेल आर्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे हेअर बँड्स, क्लिप्स, स्कार्फ, बेल्ट, ब्रेसलेट्स, इअररिंग्ज, पर्सेस आणि फूटवेअर हे सगळे अॅक्सेसरीजचं महत्त्वाचं अंग आहेत. नेल आर्ट, नेल पॉलिश, स्टिक-ऑन नेल्स हे लूकमध्ये ग्लॅमर वाढवतात. ऑफिससाठी न्यूड शेड्स, आणि पार्टीसाठी ग्लिटरयुक्त नेल्स हे एक चांगला पर्याय ठरतात..तसंच हेअर ॲक्सेसरीजमध्ये हेअर बँड्स, फ्लोरल क्लिप्स, बीडेड पिन्स हे वेगवेगळ्या हेअरस्टाइलला पूरक ठरतात. शिवाय साडीवर पारंपरिक गजरा, वेस्टर्न लूकसाठी नॉटेड हेडबँड, आणि समर लूकसाठी प्रिंटेड स्कार्फ वापरता येतो. परंतु याची रंगसंगती योग्य पद्धतीने वापरता यायला हवी. तसंच स्कार्फ्सचा वापर अनेक प्रकारे होऊ शकतो. गळ्यात गुंडाळलेला, केसांमध्ये बँड म्हणून, किंवा बॅगवर टाय करून फॅशन स्टेटमेंटसारखा. स्कार्फ हा एक ऑल-सीझन अॅक्सेसरी आहे..त्यानंतर इअररिंग्जचे तर खूप प्रकार आहेत. ऑक्सिडाईज्ड झुमके, स्टड्स, हूप्स हे वेगवेगळ्या पोशाखासोबत मॅच करता येतात. ट्रॅडिशनल साडीवर मोठे झुमके, ऑफिससाठी छोटे स्टड्स आणि पार्टीसाठी स्टोन वर्क असलेले इअररिंग्ज योग्य ठरतात.त्यानंतर वन पीससाठी ब्रॉड बेल्ट वापरून लूक डिफाईन करता येतो. क्रॉसबॉडी बॅग्ज कॅज्युअल लूकसाठी आणि क्लचेस पार्टी लूकसाठी उत्तम आहेत. फुटवेअरसुद्धा अॅक्सेसरीचाच भाग आहे. स्नीकर्स, हिल्स किवा कोल्हापुरी मॉडर्न आणि पारंपरिक चप्पल स्टायलिंगसाठी परिपूर्ण वाटतात..हे करून पाहाजास्त अॅक्सेसरीज वापरण्याऐवजी एक-दोन उठावदार अॅक्सेसरी निवडा.अॅक्सेसरी आउटफिटशी कॉम्प्लिमेंट करत आहे ना, हे बघा.पारंपरिक लूकसाठी ऑक्सिडाईज्ड किंवा कुंदन अॅक्सेसरी योग्य, तर मॉडर्न लूकसाठी मिनिमलिस्टिक किंवा लेअरिंग योग्य ठरतं.पावसाळ्यात वॉटरप्रूफ घड्याळं, रबर चपला आणि मिनिमल ज्वेलरी वापरणं योग्य..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.