Health Care News: आयुर्वेदानुसार ही आहे दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत, जाणून घ्या

सकाळ, दुपार की रात्र… कोणत्या वेळेस दूध प्यायल्याने मिळेल सर्वाधिक फायदा?
milk
milksakal

सुपर फूडच्या यादीत दुधाचा समावेश आहे. दुधामध्ये इतके पोषक तत्व असतात की ते तुमच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डॉक्टर अनेकदा दूध पिण्याचा सल्ला देतात. आपण दूध कधीही पिऊ शकतो, परंतु आयुर्वेदानुसार, दूध पिण्याची एक विशेष वेळ आहे ज्याद्वारे आपण दुधाचा पूर्ण फायदा मिळवू शकता. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार दूध कोणत्या वेळी पिणे जास्त फायदेशीर आहे?

आयुर्वेदानुसार, जर तुम्ही मसल्स बिल्डिंग वर काम करत असाल तर सकाळी दूध घेणे फायदेशीर ठरू शकते, परंतु यासाठी सर्वोत्तम वेळ संध्याकाळपासून झोपेपर्यंत आहे. तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि तुम्हाला झोपही चांगली लागते.

खरं तर, दुधामध्ये ट्रिप्टोफॅन, एक अमीनो आम्ल असते जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचे उत्पादन उत्तेजित करते. याच्या मदतीने तुम्हाला रात्री चांगली झोप येते. आयुर्वेद सांगतो की रात्री दूध प्यायल्याने तुमचे शरीर जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते, कारण यावेळी तुम्ही कमीत कमी एक्टिविटी करता.

milk
Saree Styling Tips: प्लस साइज महिलांनी साडी नेसताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कारण...

दूध पिण्याचे काय फायदे आहेत?

दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात.

दुधामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ते एनर्जी बूस्टर म्हणून काम करते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी दूध खूप फायदेशीर ठरू शकते.

दूध प्यायल्याने तुमचा थकवा दूर होतो आणि तणावातूनही आराम मिळतो.

यामुळे निद्रानाशाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

याशिवाय तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com