- मयूरी देशमुख, केतकी पालव
प्रत्येक वेळी मौखिक संवादाने मन मोकळे होते, असे नाही. कधी कधी आपली शांतताही आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त करत असते... आणि शांततेतून व्यक्त होणाऱ्या गोष्टी जिला समजतात, ती आपल्यासाठी खास असते. अभिनेत्री मयूरी देशमुख हिचं असंच काहीसं खास नातं आहे अभिनेत्री केतकी पालवीसोबत.