- मेघा शिंदे, अभिनेत्री
खरंतर आई ही व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचीच असते; पण ही गोष्ट सुरुवातीला आपल्याला कळत नाही. ज्यावेळी आपण आयुष्यात पुढे जात असतो, त्यावेळी म्हणजे प्रत्येक सुख आणि दुःखात आई आपल्याबरोबरच असते. माझी आईही माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबतच होती. माझ्या आईमुळे आमच्या कुटुंबात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडले.