
आज सकाळी उठले तेव्हा डोकं फिरलेलं होतं, सध्या त्याला कारणही तसंच आहे. आत्ता आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरी लावली आहे आणि स्ट्रॉबेरी म्हणजे ‘कॅश क्रॉप’. त्याच्यावरती सगळा व्यवसाय अवलंबून असतो आणि अर्थातच त्यांचं पोट अवलंबून असतं. रात्री प्राणी येऊन पीक खाऊ नये म्हणून, आणि दिवसा पाखरं लांब राहावीत म्हणून, त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे किंवा दुसऱ्या कोणीतरी ती लढवली आहे आणि शेतकऱ्यांना ती ‘विकली’ आहे. ती गोष्ट म्हणजे लाऊडस्पीकर्स!