प्रत्येकासाठी आपली आई अतिशय महत्त्वाचीच असते. कारण लहानपणापासून तिनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. मी अभिनय क्षेत्रात पदार्पण करून साधारण १३ ते १४ वर्षं झाली; पण अशा पद्धतीच्या वेगळ्या क्षेत्रात आपल्या मुलीनं जाणं किंवा काम करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो.