एरवी कधी आवराआवर करूया असं म्हटलं, की चालढकल होते; परंतु आवर्जून आवरायला आवडतं ते म्हणजे केवळ ‘माझं मेकअप किट’. या रविवारी वेळ होता. म्हटलं, माझी स्टुडिओ रूम आवरुया. पुण्यात आल्यापासून स्वतंत्र अशी मेकअप रूम झाली आहे. रूम आवरत असताना बऱ्याच गोष्टी तरळून गेल्या. मेकअपसाठीचं किती संपन्न कीट आहे आपलं. आधी असं नव्हतं. या गोष्टींचा साधा गंधही नव्हता.. कसा असणार म्हणा? त्यावेळी खूपच लहान होते मी.