- वल्लरी विराज
नृत्य हा माझा छंद आहे. मला नृत्य करायला खूप आवडतं. मला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती. कधी टीव्हीला एखादं आवडीचं गाणं लागलं, की मी लगेच नाचू लागायचे. माझ्या आवडीची एखादी अभिनेत्री नाचत असेल, तर मी तिचं पाहून डान्स करायचे, तिची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हापासूनच ही आवड मला लागली आणि पुढे मी ती जोपासलीसुद्धा.