‘आपलं सर्वस्व एखाद्याला देणं’ याचा खरा अर्थ मी दोन वर्षांपूर्वी अनुभवला..
सहा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली. गोड, गुबगुबीत, गोरीपान, निळ्या डोळ्यांची, अत्यंत लाघवी, मस्तीखोर, गुणी, मऊशार पांढऱ्या केसांची... चॉकलेटी कान आणि शेपूट असलेली! हिमालियन जातीची माझी ‘छकुली’ म्हणजेच माझ्या आठ बाळांपैकी एक माऊ!