Healthy Tips : जास्त खाल्ल्यानंतर पोट जड होतंय का? 'या' घरगुती उपायांमुळे मिळेल आराम

बऱ्याचवेळा लग्न, पार्टी किंवा समारंभात काही तळलेले-भाजलेले पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवतो.
Healthy Tips : जास्त खाल्ल्यानंतर पोट जड होतंय का? 'या' घरगुती उपायांमुळे मिळेल आराम

बऱ्याचवेळा लग्न, पार्टी किंवा समारंभात काही तळलेले-भाजलेले पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवतो. अनेकांना हा त्रास जाणवलाही असेल. अशावेळी खूप अस्वस्थ वाटयला लागते. यावर उपाय म्हणून आपण पित्ताची गोळी किंवा इनोची मदत घेतो. दरम्यान, अशा परिस्थितीत काही घरगुती उपायही केले जातात. त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. अशी समस्या उद्भवली तर तुम्ही त्यावर पुढील काही घरगुती उपाय केल्यानंतर आराम मिळू शकतो..

बडीशेप आणि साखर कँडी

अनेक कार्यक्रमांच्या जेवणानंतर बडीशेप आणि साखरेचे एकत्र सेवन केले जाते. त्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला पोट हलके झाल्यासारखे वाटते. बडीशेपमुळे जडपणा जाणवत नाही आणि साखर कँडी खाल्ल्याने तोंडाला येणारा कच्चा कांदा किंवा अन्नाचा वास दूर होतो. त्यामुळे हा घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

Healthy Tips : जास्त खाल्ल्यानंतर पोट जड होतंय का? 'या' घरगुती उपायांमुळे मिळेल आराम
लवकर पैसा कमवायचाय? घरी घेऊन यातील एक गोष्ट, झटक्यात आयुष्य बदलेल

भिजवलेल्या जवसाच्या बिया

खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवत असेल तर जवसाच्या बियांच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी काही जवसाच्या बिया पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि त्याचे पाणी प्यावे. जवसाच्या बियांचे हे पाणी रात्री जेवणानंतर आणि सकाळी पुन्हा उठल्यानंतर प्या. त्यामुळे पचनक्रिया चांगली आणि शुद्धही राहते.

हिरवी वेलची

जेवणानंतर लगेच वेलची खाल्ल्याने पोटातील जडपणा दूर होतो. पोट फुगण्यापासून रोखण्यासाठी वेलची मदत होते. आरोग्यासाठी हे उपयुक्त आहे. जेवणानंतर 1 किंवा 2 हिरव्या वेलची चावून खाल्ल्याने पोट जड होण्याच्या समस्येपासून आणि तोंडाला येणाऱ्या अन्नाच्या वासपासून दूर राहता येते. त्यामुळे अनेकवेळा काहीजण याचा वापर करताना दिसतात.

Healthy Tips : जास्त खाल्ल्यानंतर पोट जड होतंय का? 'या' घरगुती उपायांमुळे मिळेल आराम
बिछडे भाई फिर मिले! तब्बल 75 वर्षांनी पुन्हा भेटले अन् मिठी मारून ढसाढसा रडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com