Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Akshaya Tritiya 2024 : यंदा १० मे (शुक्रवारी) अक्षय्य तृतीया सर्वत्र साजरी केली जाणार आहे.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024esakal

Akshaya Tritiya 2024 : अवघ्या काही दिवसांवर अक्षय्य तृतीयेचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, मार्केटमध्ये सर्वत्र अक्षय्य तृतीयेची धामधूम पहायला मिळत आहे. यंदा १० मे (शुक्रवारी) अक्षय्य तृतीया सर्वत्र साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

अक्षय्य म्हणजे जे कधीही संपत नाही असे. त्यामुळे, या महत्वाच्या दिवशी सोने खरेदी, नवीन घरातील गृहप्रवेश, नवीन व्यवसायास सुरूवात इत्यादी अनेक महत्वाच्या कार्यांचा शुभारंभ केला जातो. विशेष म्हणजे या दिवशी स्नान, दान, आणि पूजा करणे महत्वाचे मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांची ही पूजा केली जाते.

कुबेर देवता ही संपत्तीची देवता आहे. त्यामुळे, अक्षय्य तृतीयेला कुबेर देवतेची पूजा करणे शुभ मानली जाते. अक्षय्य तृतीयेला कुबेर देवतेची पूजा केल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. आज आम्ही तुम्हाला कुबेर देवता आणि अक्षय्य तृतीयेचा काय संबंध आहे? त्याबद्दल सांगणार आहोत.

अक्षय्य तृतीया आणि कुबेर देवतेचा संबंध काय?

माता लक्ष्मीला हिंदू धर्मात संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. अगदी त्याचप्रमाणे, भगवान कुबेर यांना संपत्तीचा देवता किंवा धनाचा देव मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अल्कापुरी नावाच्या राज्यावर राज्य करण्याची जबाबदारी भगवान कुबेर यांच्यावर देण्यात आली होती.

यासोबतच कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी ही मिळाली होती. याच दरम्यान कुबेर यांना महादेवांनी धनवान होण्याचे वरदान दिले होते. हे सर्व अक्षय्य तृतीयेच्या तिथीला घडल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे, अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय महत्वाचा मानला जातो.

त्यामुळे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते. या दिवशी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगती होते, असे मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com