
Akshaya Tritiya 2025: हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा खेरदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी मानला जातो. पारंपारिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी लाभू शकते.