Alia Bhatt Saree : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आलियाने नेसलेली साडी बनवायला लागले तब्बल 100 तास; पाहा काय आहे खास?

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलिया भट्टने खास साडी नेसली होती. तिच्या या साडीवर रामायणातील महत्वाच्या घटनांची चित्रे दिसून आली होती.
Alia Bhatt Sari
Alia Bhatt Sari esakal

Alia Bhatt Sari : अयोध्येमध्ये २२ जानेवारीला (सोमवारी) प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा नुकताच पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. या सोहळ्याला क्रीडा, मनोरंजन, राजकारण इत्यादी अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याला अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्टनेही उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यासाठी आलिया भट्टने खास साडी नेसली होती. तिच्या या साडीवर रामायणातील महत्वाच्या घटनांची चित्रे दिसून आली होती. त्यामुळे, तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आलियाची ही साडी का आहे खास?

Alia Bhatt Sari
Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला पांढरा ड्रेस परिधान करायचा आहे? मग, अभिनेत्रींच्या ‘या’ लूक्सपासून घ्या प्रेरणा

आलियाची साडी का आहे खास?

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या आलियाने आकाशी कलरची म्हैसूर सिल्क साडी परिधान केली होती. माधुर्य क्रिएशन्सच्या लेबलच्या नावाची ही साडी या सोहळ्यामध्ये आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरली. आलिया या साडीमध्ये सुंदर दिसत होती. परंतु, इतर कारणांमुळे ही आलियाच्या या साडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Alia Bhatt sari
Alia Bhatt sari

कारण, आलियाच्या या सुंदर साडीवर रामायणातील काही महत्वाच्या घटनांची सुंदर झलक दिसली. ही संपूर्ण झलक तिच्या साडीच्या बॉर्डरवर पहायला मिळाली. या बॉर्डरमुळे तिची ही साडी आणखी खास बनली.

साडी बनवायला लागले तब्बल १०० तास

आलियाने नेसलेल्या या साडीची खासियत सांगताना स्वत: तिने तिची स्टायलिस्ट अमी पटेलची इन्स्टाग्राम पोस्ट स्टोरीमध्ये शेअर केली होती. या पोस्टनुसार, आलियाच्या या साडीवर पारंपारिक पट्टाचित्र शैलीमध्ये रामायणाची लघुचित्रे तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही लघुचित्रे पूर्ण करण्यासाठी तब्बल १०० तास लागले होते. रामायणातील महत्वाच्या घटनांची ही लघुचित्रे साडीच्या बॉर्डरवर आणि पदरावर अतिशय बारकाईने रंगवण्यात आली आहेत.

आलियाच्या साडीवरील या लघुचित्रांमध्ये शिवधनुष्य मोडणे, राजा दशरथाने दिलेले वचन, सोन्याचे हरिण, सीतेचे अपहरण, रामसेतू, भगवान हनुमानाने माता सीतेला प्रभू श्रीरामांची अंगठी भेट देणे, श्रीराम अभिषेकाची झलक इत्यादी चित्रांचा समावेश आहे.

आलियाने असा पूर्ण केला तिचा लूक

आलियाने धार्मिक महत्व असलेली ही खास साडी अतिशय स्टायलिश पद्धतीने कॅरी केली होती. या साडीवर तिने मॅचिंग ब्लाऊज घातला होता, आणि लेबल दुसाना य ब्रॅंडची मॅचिंग पश्मिना शॉल तिने कॅरी केली होती. आलियाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी केसांची लो बन हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअपची मदत घेतली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती, यात काही शंका नाही.

Alia Bhatt Sari
Woman Fashion : एकाच प्रकारचे स्कर्ट घालून कंटाळा आलाय? मग, अशा प्रकारे स्टाईल करा प्लीटेड स्कर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com