
Anand Mahindra : स्ट्रेसच्या समस्येने त्रस्त आहात?; मग महिंद्रांचा हा व्हिडिओ एकदा पाहाच
Anand Mahindra Tweet On Stress Management : आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना विविध समस्यांना ग्रासलेले आहे.
त्यात कामाचा वाढता ताण पाहता अनेकांना स्ट्रेस समस्येने ग्रासले आहे. लोकांची हीच समस्या लक्षात घेता उद्योगपती आनंद महिंद्रांनी एक डिप थॉट असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना 'स्ट्रेस मॅनेजमेंट' शिकवताना दिसत आहेत. यात शिक्षक पाण्याचा ग्लास भरून सुरुवात करतात आणि नंतर विद्यार्थ्यांना विचारतात 'हा पाण्याचा ग्लास किती भारी आहे?' या प्रश्नावर प्रत्येक विद्यार्थी उत्तर देतो पण शिक्षकाचे समाधान होत नाही.
त्यानंतर संबंधित शिक्षक असा युक्तिवाद करतो की, वजन महत्त्वाचे नाही. कारण तुम्ही एखादी गोष्ट किती काळ धरून ठेवता त्यावर वजन अवलंबून असते.
हा ग्लास काही मिनिटे धरून ठेवल्यास काही जाणवणार नाही. मात्र, ग्लास तासभर धरून ठेवल्यास हात दुखण्यास सुरू होईल.
जीवनातील ताण तणावाचेदेखील याच भरलेल्या ग्लासप्रमाणे आहे. उदा. एखादी घटना किती मनावर घ्यायची आणि त्याचा किती ताण करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून असते.
त्यामुळे विचार आणि ताण कमी घेतल्यास समस्येचा त्रास कमी होईल. परंतु, एखाद्या व्यक्तीने अतिविचार केला तर, कालांतराने त्याचे परिणाम दिसून येण्यास सुरूवात होते.
आनंद महिद्रांनी हा व्हिडिओ आठवड्याची सुरूवात होते तेव्हा म्हणजे सोमवारी शेअर केला आहे. कारण सुट्टीनंतर कामावर जाताना अनेकजण तणावात असतात. त्यामुळे हा व्हिडिओ स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अतिशय उत्तम असाच आहे.
हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र, अनेकदा बघूनही तो पाहणे कंटाळवाणे वाटत नसल्याचे कॅप्शन महिंद्रांनी दिले आहे. स्ट्रेस कमी करणारा या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून, आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.