Anant Radhika Wedding : ‘या’ सुंदर ठिकाणी होणार अनंत-राधिकाचे लग्न, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘जस्ट लूकिंग लाईक अ वॉव’.!

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला मुंबईमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.
Anant Radhika Wedding
Anant Radhika Weddingesakal

Anant Radhika Wedding : सध्या जगभरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा होताना पहायला मिळत आहे. १२ जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट मुंबईमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वी इतर सोहळ्यांना सुरूवात झाली असून, याला हॉलिवूड, बॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांमधील मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

या सोहळ्यांमधील सेलिब्रिटींचे आणि अंबानी कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. नुकताच अनंत आणि राधिकाचा मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला. आता उद्या हे कपल मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सात फेरे घेणार आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याचे हे ठिकाण अतिशय उत्तम असून, त्याचे फोटो पाहिल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, यात काहीच शंका नाही.

Anant Radhika Wedding
Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या पुजेला वरमाईंचा रॉयल अंदाज, परिधान केला चक्क सोन्याचा ब्लाऊज.!

राधिका अन् अनंतचा शाही विवाहसोहळा

राधिका आणि अनंतच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. या सोहळ्यांना बॉलिवूड, हॉलिवूड आणि इतर क्षेत्रांमधील दिग्ग्ज व्यक्तींची उपस्थिती दिसून येत आहे.

लग्नाआधी राधिका-अनंतचे २ प्री-वेडिंग फंक्शन्स मोठ्या उत्साहात पार पडले. नुकताच अनंत-राधिकाचा हळदी-मेहंदी सोहळा पार पडला. त्यापूर्वी, गरबा नाईट, संगीत सोहळा पार पडला.

या ठिकाणी होणार अनंत-राधिकाचे लग्न

अनंत-राधिकाचे लग्न १२ जुलैला मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. हे ठिकाण अतिशय अप्रतिम आहे. २०२२ मध्ये जिओ कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

१ लाख चौरस फुटांवर पसरलेले हे जिओ सेंटर जगातील प्रिमियम डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. या सेंटरमध्ये अनेक सुंदर हॉल आणि क्लब हाऊस आहेत. ज्यामध्ये, मोठे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.

का खास आहे जिओ कन्हव्हेन्शन सेंटर

जिओ वर्ल्ड कन्हव्हेन्शन सेंटरमध्ये तब्बल ३२०० चौरस फुटांची बॉलरूम आहे. या ठिकाणी ३००० हून अधिक लोक एकत्र जमू शकतात. महत्वाची बाब म्हणजे या केंद्रात बसवलेल्या लिफ्टचा आकारही २ बीएचके फ्लॅटइतका मोठा आहे.

या सेंटरमध्ये सर्व लक्झरी सुविधांचा समावेश असून, सुंदर बागा आणि जेवणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अंबानी कुटुंबाच्या या लग्नाला अनेक बड्या व्यक्ती हजर असणार आहेत. त्या दृष्टिकोनातून हा हॉल अधिक सुंदर पद्धतीने सजवण्यात आला आहे.

Anant Radhika Wedding
Anant Radhika Wedding: १०० खासगी अन् ३ फाल्कन विमाने; अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना मिळणार लक्झरी ट्रीटमेंट

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com