Anant-Radhika Sangeet: संगीत सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाची थीम ठरली, बॉलिवूड सेलिब्रिटीही फॉलो करणार 'हा' स्पेशल ड्रेसकोड

Anant-Radhika Sangeet Program: अनंत-राधिकाचा मामेरू सोहळा पार पडल्यानंतर आज ५ जुलैला (शुक्रवारी) अनंत-राधिकाचा संगीत सोहळा रंगणार आहे.
Anant-Radhika Sangeet
Anant-Radhika Sangeetesakal

Anant-Radhika Sangeet : रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार असून विवाहसोहळ्यापूर्वी होणाऱ्या विधींना सुरूवात झाली आहे.

नुकताच अनंत-राधिकाचा मामेरू सोहळा पार पडल्यानंतर आज ५ जुलैला (शुक्रवारी) अनंत-राधिकाचा संगीत सोहळा रंगणार आहे.

या संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूड हॉलिवूडचे अनेक कलाकार आणि गायक सहभागी होणार असून विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा संगीत सोहळा खास बनवण्यासाठी अंबानी कुटंबाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या संगीत सोहळ्याची थीम काय असणार? आणि बॉलिवूड कलाकार कोणता ड्रेस कोड फॉलो करणार? चला तर मग जाणून घेऊयात.

Anant-Radhika Sangeet
Radhika Merchant: मामेरू सोहळ्यात राधिका मर्चंट नटली गुजराती लुकमध्ये, पण हे मामेरू म्हणजे नक्की काय?

अनंत-राधिकाचा संगीत सोहळा

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचे नियोजन त्यांच्या लग्नाच्या ६ दिवस आधीच अर्थात आज (५ जुलै) केले आहे. सायंकाळी ७ वाजता हा संगीत सोहळा सुरू होणार असून, या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत अंबानी कुटुंबातील सर्वांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

अनंत-राधिकाचा हा संगीत सोहळा मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. या सेंटरमध्ये जवळपास २००० लोकांची बसण्याची व्यवस्था कऱण्यात आली आहे.

सेलिब्रेशन ऑफ हार्ट्स

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात व्हायरल झालेल्या कार्डवर या खास दिवसाला विशेष नाव देण्यात आले आहे. अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी करण्यात येणाऱ्या या खास संगीत सोहळ्याला ‘सेलिब्रेशन ऑफ हार्ट्स’ – ए नाईट ऑफ साँन्ग, डान्स आणि वंडर’ असे नमूद करण्यात आले आहे. लग्नापूर्वीचा हा संगीत सोहळा अनंत-राधिकासाठी संस्मरणीय ठरणार आहे. एवढ मात्र नक्की.

संगीत सोहळ्यासाठी ड्रेसकोड काय?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. हा ड्रेसकोड केवळ अंबानी कुटुंबच पाळणार नाही, तर कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांनाही पाळावा लागणार आहे. खरे तर अनंत-राधिकाला हा संगीत सोहळा पारंपारिक भारतीयच ठेवायचा आहे. त्यामुळे, अंबानी कुटुंबाने संगीत सोहळ्यासाठी ड्रेसकोडची थीम ‘इंडियन रिगल ग्लॅम’ अशी ठेवली आहे.

बॉलिवूड-हॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती

अनंत-राधिकाच्या या संगीत सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड, उद्योगपती, क्रिकेटपटू आणि परदेशी सेलिब्रिटी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये संगीत सोहळ्याला हा खास ड्रेसकोड फॉलो करावा लागणार आहे. या संगीत सोहळ्यानंतर अनंत-राधिकाचा मेहंदी सोहळा कधी रंगणार? ते अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

Anant-Radhika Sangeet
Radhika Merchant : अंबानींच्या डिनर पार्टीत राधिका मर्चंटच्या पटोला सूटने वेधले लक्ष, सोज्वळ लूक होतोय व्हायरल.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com