संवादसेतू : खाण्याशी संबंधित मनोसमस्या

Eating Disorders: Understanding Anorexia Nervosa : शरीर जाड दिसण्याच्या भीतीने खाणे कमी करणे, अतिव्यायाम आणि मुद्दाम उलट्या करणे ही अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसाची लक्षणे असू शकतात. योग्य वेळी मानसोपचार आणि कौटुंबिक समुपदेशन महत्त्वाचे ठरते.
Eating Disorders: Understanding Anorexia Nervosa

Eating Disorders: Understanding Anorexia Nervosa

esakal

Updated on: 

डॉ. मृदुला आपटे ; क्लिनिकल सायकोलॉजिस्ट

सिमरनचं वजन झपाट्याने व खूप कमी झालं होतं. सामान्यत: तिला इतर कोणती आरोग्य समस्याही नव्हती. तरी असं का झालं?... याचं उत्तर तिच्या मनात सापडलं.

सिमरनला वयाच्या बाराव्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली. त्यानंतर ती आपल्या दिसण्याबद्दल आणि वजनाबद्दल अधिकच जागरूक झाली. आजूबाजूचे लोक कधी कधी तिला जाड किंवा स्थूल म्हणत. मग तिने हळूहळू खाणं कमी करायला सुरुवात केली. कमी खाण्यामुळे आपल्याला खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवता येतंय, ही भावना तिला आवडू लागली. काही महिन्यांतच ती प्रमाणापेक्षा खूपच बारीक दिसू लागली आणि आजी-आजोबांना काळजी वाटू लागली.

Loading content, please wait...