वाचन प्रेरणा दिवस : Missile man अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी पुस्तके

वाचन प्रेरणा दिवस : Missile man अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी पुस्तके

भारताचे लाडके माजी राष्ट्रपती आणि 'मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज वाढदिवस. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तमिलनाडूच्या रामेश्वरम शहरामध्ये मध्यमवर्ग मुस्लिम कुटुंबामध्ये झाला होता. हा दिवस महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. विविध कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

APJ abdul kalam
APJ abdul kalam

का साजरा केला जातो वाचन प्रेरणा दिवस ?

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांना हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. अब्दुल कलाम यांना पुस्तक वाचायला आवडतं असे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ जयंती दिनी म्हणजेच 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. मुलांना वाचन करण्याचे महत्त्व समजावे आणि छंद म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. अब्दुल कलाम यांना आयुष्यभर आपल्या कृतीतून आणि विचारांमधून सर्वांना प्रेरणा दिली आहे. भारतातील तरुणाईला वाचनाची सवय लावण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले आणि त्यांनी स्वतः अणुभौतिकशास्त्रापासून अध्यात्मिक अनुभवांपर्यंतच्या विषयांसह किमान 15 प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.

डॉ. एपीजे कलाम यांनी लिहिलेली काही सर्वाधिक वाचली जाणारी प्रेरणादायी पुस्तके

टर्निंग पॉईंट : अ जर्नी थ्रु चॅलेंजेस (Turning Points: A Journey Through Challenges (टर्निंग पॉइंट्‌स याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)

हे पुस्तक शीर्षकानुसार कलाम यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे टर्निंग पॉइंट्सवर आधरित आहे. भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ते देशाचे राष्ट्रपती या जीवप्रवासाबाबत त्यांनी या पुस्तकामध्ये लिहले आहे. या पुस्तकामधून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्तवाची ओळख आपल्याला जाणून घेता येतेच त्यासोबत ऐतिहासिक वारसा असलेला भारतासारखा देश इतर बाबींमध्ये देखील कसा निपून होऊ शकतो याबाबतचे कलाम यांचे विचार यामध्ये मांडले आहेत. हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर भारताला नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रेरणा देणारी गाथा आहे.

इग्नाइटेड माइंड्‌स (Ignited Minds: Unleashing the power within India)

(प्रज्वलित मने या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)

अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये प्रज्वलित मनांची ताकदीने भारताला भेडसवाणारे प्रश्न कसे सोडविता येतील यांची माहिती दिली आहे. भारताच्या विकासासाठी अब्दुल कलाम यांनी व्हिजन मांडले आहे. कलमा याच्या दृष्टीकोनातून जगाला पाहण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

Wings of Fire: An Autobiography of Abdul Kalam

विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र) मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे तामिळनाडूतील रामेश्वरममधील एका अशिक्षित नावाडी अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन यांचा मुलगा ज्यांने संरक्षण शास्त्रज्ञ म्हणूनअतुलनीय कारकीर्द निर्माण केली आणि अखेर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या भारतरत्नने त्यांना सन्मानित करण्यात आले. देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून कलाम यांनी मोरबंड संशोधन संस्थांमध्ये अस्तित्वात असलेली गतिमानता आणि नावीन्यपूर्णतेची मोठी क्षमता दर्शविण्याचे काम केले. कलाम यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्षांची आणि यशाची कथा आहे, तसेच अग्नि, पृथ्वी, आकाश, त्रिशूल आणि नाग या क्षेपणास्त्रांनी देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले त्या क्षेपणास्त्र शक्तीची कथा या पुस्तकामध्ये मांडली आहे. तंत्रज्ञानाच्या स्वावलंबनासाठी आणि संरक्षणात्मक स्वायत्ततेसाठी स्वतंत्र भारताच्या संघर्षाची ही गाथा आहे आणि ही कथा जितकी विज्ञानाबाबत तितकीच ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाबद्दल आहे

माय जर्नी : टान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू अॅक्शन

My Journey: Transforming Dreams into Actions

‘माय जर्नी: ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन अॅक्शन’ हे पुस्तक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जिद्द, चिकाटी आणि जीवनात उत्कृष्ट होण्याचे धैर्याची कथा आहे. कादंबरीत कलाम यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अनुभवांचे अत्यंत वर्णनात्मक आणि अतिशय प्रभावी उल्लेख केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com