
Side Effects Of Using Alovera Gel: कोरफड जेल त्वचेसाठी फायदेशीर असते. कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि खनिजे असतात. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते. तसेच त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे मुरुम आणि त्वचेचे संक्रमण दूर करण्यास मदत करतात.
शिवाय, ते त्वचेसंबंधित असलेल्या समस्या दूर करतात. दररोज कोरफड जेलचा वापर केल्याने त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास मदत होते आणि ती ताजी राहते. पण तुम्हाला माहिती आहे का की जर ते योग्यरित्या वापरले नाही तर ते काही नुकसान देखील करू शकते.
अँटिऑक्सिडंट्ससोबतच, कोरफडीमध्ये अनेक घटक आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात, परंतु त्याचे काही तोटे देखील असू शकतात. तुम्ही जर रोज कोरफड जेल वापरत असाल तर कोणते नुकसान होऊ शकतात हे जाणून घेऊया.