
Appraisal Tips : अप्रेजल जवळ आलंय; बॉसला या गोष्टी सांगाल तर मिळेल भरगोस पगारवाढ
मुंबई : बहुतेक कंपन्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन (appraisal) करतात. कर्मचारी वर्षभरापासून या वेळेची वाट पाहात असतात.
मूल्यांकनापूर्वी एक मीटिंग होते. यात तुमच्या कामाबाबत तुम्हाला बॉसशी चर्चा करावी लागते. या चर्चेत काय बोलायचे, काय सांगायचे, बॉसला कामाबाबत प्रभावित कसे करायचे, हे जाणून घेऊ. हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Office Image : तुमची ऑफीसमधील प्रतिमा कशी सुधाराल ?
स्वतःला अपयशी समजू नका
बर्याच वेळा तुमचा बॉस तुम्हाला सांगतो की तुम्ही जे केले आहे, त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला अपयशी समजू नका.
अशा वेळी तुम्ही तुमचे आतापर्यंत केलेले सर्व काम दाखवावे. तरच तुम्हाला अपेक्षित मूल्यांकन मिळेल.
कामाची नोंद ठेवा
तुमच्या कामाची नोंद नेहमी ठेवा. यामुळे तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या सर्व प्रोजेक्ट्सबद्दल सहज सांगू शकाल. तुमच्या कामाचा आवाका किती आहे याची बॉसला कल्पना येऊ शकेल.
हेही वाचा: Women Life : स्त्रीदेहाबद्दल या गोष्टी पुरूषच काय पण स्वत: महिलांनाही माहीत नसतात
आत्मविश्वास बाळगा
तुमच्या कामाबाबतच्या भविष्यातील नियोजनाबाबत सांगा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या. बॉसला आत्मविश्वासू माणसे आवडतात.
नकारात्मकता बाळगू नका
एखादं काम होऊच शकत नाही. ते कठीणच आहे किंवा 'मी मुलगी आहे मग हे काम कसं करणार', 'मी लहान आहे', अशाप्रकारची नकारात्मक वक्तव्ये करू नका.
अशा पद्धतीने बॉसशी चर्चा केल्यास चांगली पगारवाढ मिळू शकेल. तसेच वर्षभर कामाचे सातत्य ठेवा. त्यामुळे अप्रेजल मीटिंगमध्ये तुमची वर्तणूक खोटी वाटणार नाही.